लग्नसराईच्या काळात सोन्याची किंमतीत किंचित घट दिसून आली आहे. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. एमसीएक्सवर मौल्यवान सोन्याचा धातू ०.०७ टक्क्यांनी घसरला आहे. यानंतर आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७,८७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आला आहे. COMEX येथे सोन्याच्या किमती कमी झाल्या असून १७८३ अमेरिकन डॉलर प्रति औंसवर १ टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली. तर याउलट चांदीच्या किमतीत मात्र ०.१३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीसह चांदीचा भाव ६१,५९९ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

एक्साइज ड्यूटी, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याची किंमत देशात वेगवेगळ्या असतात. दागिने बनवण्यासाठी बहुतेक २२ कॅरेटचा वापर केला जातो. काही लोक १८ कॅरेट सोने देखील वापरतात. दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉल मार्क बनवले जाते. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० लिहिलेले असते.

Gold HallMarking: ज्वेलरीवर छापलेल्या हॉलमार्कचा अर्थ काय?, जाणून घ्या

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट सुमारे ९१ टक्के शुद्ध आहे.२२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.