चिंता किंवा तणाव आपल्या आरोग्यवर खूप परिणाम करते. तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. सेंटर ऑफ हीलिंग (TCOH) च्या संशोधनानुसार, ७४ टक्के भारतीयांनी तणावाविषयी तर ८८ टक्के लोकांनी तणावाची तक्रार सांगितलेली आहे. तणाव ही समस्या निर्माण झाल्यावर थकवा वाटू लागतो. तणावामुळे अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अॅसिडीटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात. तर घरात राहून देखील या सर्व समस्येवर मात करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात तणाव कमी करण्यास मदत करणारे काही टिप्स.

हेल्दी खा आणि व्यायाम करा

तुमच्या दररोजच्या आहारात चांगले आणि हेल्दी अन्न खा आणि व्यायामाची सवय लावा. तसेच घरातल्या घरात फिरत रहा. किंवा एखाद्या तुमच्या आवडत्या अॅक्टिविटी बद्दल ऑनलाइन क्लास लावा. यामुळे तुमच्या एंडोर्फिनची पातळी वाढेल आणि तणाव कमी होईल. यासोबतच ताजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

रोजच्या दिनचर्यामध्ये बद्दल करा.

ताण कमी करण्यासाठी तुमच्या रोजच्या दिनचर्यामध्ये बद्दल करा. तुम्ही तुमच्या रोजच्या सवयी बद्दल्या तर तुम्ही तणावमुक्त व्हाल. रोजच्या सवयी बदल्या तर त्यात व्यस्थ रहाल. एखादे कामात व्यस्थ रहाल तर जास्त तणावात रहाणार नाही. तसेच हे तुम्ही रुटिंग म्हणून सवयींचे पालन केलं तर ताण निश्चित कमी होईल.

मेडिटेशनच सराव करा.

जर तुम्हाला तणावावर मात करायची असेल तर मेडिटेशनच करा. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी घेऊन तुम्ही ध्यान करा. ध्यान करण्याआधी डोक्यातील विचार सर्वकाही विसरून जा आणि आपल्या स्वःताकडे ध्यान केंद्रीत करून मेडिटेशन करा. तुम्ही मेडिटेशनसाठी ऑनलाईन व्हिडीओची मदत देखील घेऊ शकता.