आपल्याला कोणत्याही गोष्टीची संपूर्ण माहिती पुरवणारा सर्च इंजिन गूगल आज २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी गुगलने एक छानस डूडल बनवलं आहे. डूडलमध्ये दाखवलेल्या केकवर २३ आकडा लिहिलं आहे. त्यात मेणबत्तीच्या डिझाईनसह त्याला सुंदरता देण्यात आली आहे. इंटरनेट सर्च इंजिन म्हणून गुगल हे आज जगातील सर्वात मोठे प्लेटफॉर्म आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची माहिती मिळवायची असते तेव्हा गुगलद्वारे सर्च करून संपूर्ण माहिती मिळवता येते. जवळजवळ प्रत्येक प्रश्नाच आणि प्रत्येक माहिती गुगल जवळ आढळते. चला जाणून घेऊया गुगलच्या वाढदिवसाशी संबंधित खास गोष्टी..

१९९८ मध्ये कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी सप्टेंबर महिन्यात गुगलचा शोध लावला. प्रत्येक्षात गूगल ची सुरुवात एक रिचर्स प्रोजेक्ट म्हणून झाली होती. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी Google.stanford.edu या एड्रेसवर इंटरनेट सर्च इंजिन तयार केले. तसेच लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन यांनी अधिकृतपणे लॉंच होण्यापूर्वी त्याला ‘बॅकरब’ असे नाव दिले. जे की नंतर गुगल केले गेले. यावेळी या दोन्ही विद्यार्थ्यानी त्यांच्या या सिस्टम चे नाव त्यांनी गूगल ठेवले. कारण गूगल (googol) चे सामान्य शब्दलेखन आहे. हे त्यांचे मोठ्या प्रमाणावर सर्च इंजिन तयार करण्याच्या ध्येयावर केंद्रित आहे.

Nagpur, Jyoti Amge, World's Shortest Woman, World's Shortest Woman voting, World's Shortest Woman in nagpur, lok sabha 2024, polling day, nagpur news, guinness book
जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
What is the hottest place on earth
पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे? येथे माणूस राहू शकतो का? जाणून घ्या येथे किती आहे तापमान?

२७ सप्टेंबर Google साठी का खास आहे?

Google.com डोमेन १५ सप्टेंबर १९९५ रोजी नोंदणीकृत होते. Google ४ सप्टेंबर १९९८ रोजी कंपनी म्हणून नोंदणीकृत केले होते. २७ सप्टेंबर रोजी गुगल सर्च इंजिनवर रिकॉर्ड नंबर पेज सर्च केले गेले. तेव्हापासून गुगलचा वाढदिवस या दिवशी साजरा केला जातो. गुगल आज जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आज तुम्ही गुगलच्या माध्यमातून १०० पेक्षा जास्त भाषांमध्ये तुम्ही माहिती शोधून घेऊ शकता. सर्च इंजिन गुगल लॅपटॉप, कॉम्प्युटरसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.