Amla Benefits cholesterol control: कोलेस्ट्रॉल वाढणे हा खराब आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीचा परिणाम आहे. कोलेस्टेरॉल हा रक्तातील चरबीसारखा पदार्थ आहे. चुकीच्या आहारामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते. कोलेस्टेरॉल हा एक खराब पदार्थ आहे जो रक्ताच्या नसांमध्ये जमा होतो. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिनीचे आजार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका जास्त असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलेस्टेरॉल वाढल्याने त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. घाम येणे, थकवा येणे, अशक्तपणा येणे, भूक न लागणे ही कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे आहेत. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर पिवळे डाग दिसणे हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर आहाराची काळजी घ्या. आहारात अशा पदार्थांचे सेवन करा जे सहज कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकतील.

पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आवळा खाण्याचा सल्ला दिला आहे. एक्सपर्टने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे की आवळ्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. जाणून घेऊया तज्ज्ञांच्या मते आवळा खाण्याचे काय फायदे आहेत.

( हे ही वाचा: केवळ दुधातच नाही तर ‘या’ १० गोष्टींमध्येही असते भरपूर कॅल्शियम; आजच करा आहारात समावेश)

आवळ्याचे सेवन कोलेस्टेरॉल कसे नियंत्रित करते?

व्हिटॅमिन सी ने समृद्ध आवळा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात आणि शरीर निरोगी राहते. आवळा ही अशीच एक औषधी वनस्पती आहे जी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे. PPAR-A हे लिपिड आणि कोलेस्टेरॉल मेटाबॉलिज्म मध्ये समावेश असलेले एक प्रमुख प्रोटीन आहे, आवळ्याचे सेवन हे प्रोटीन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. याच्या सेवनाने शरीरातील एकूण कोलेस्टेरॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल, व्हीएलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होते.

आवळ्याचे आरोग्यदायी फायदे

  • तज्ज्ञांच्या मते आवळ्याचे सेवन शरीरात जादुई गोळ्यांसारखे काम करते. याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
  • बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते, अशा परिस्थितीत आवळ्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
  • आवळा खाल्ल्याने सर्दी आणि खोकला थांबतो.
  • याचे सेवन केल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर निरोगी राहते.
  • आवळ्याचे सेवन केल्याने केसांची वाढ वाढते आणि केस निरोगी राहतात.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gooseberry benefits for cholesterol control know its 5 benefits from expert gps
First published on: 10-12-2022 at 10:41 IST