सरकारने लोकप्रिय फाइल-शेअरिंग वेबसाइट WeTransfer वर घातली बंदी

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने WeTransfer.com ही वेबसाइट केली ‘बॅन’…

(Express Photo: Mohammad Faisal)

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने WeTransfer.com ही लोकप्रिय फाइल-शेअरिंग वेबसाइट ‘बॅन’ केली आहे. ही वेबसाइट बॅन करण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, जनहित आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकारने ही वेबसाइट बॅन केल्याचं सांगितलं जात आहे.

फाइल शेअरिंगसाठी WeTransfer ही एक लोकप्रिय वेबसाइट आहे. जगभरात  50 मिलियनपेक्षा जास्त लोक या वेबसाइटचा वापर करतात. Mumbai Mirror च्या वृत्तानुसार, दूरसंचार विभागाने WeTransfer च्या देशातील तीन URL बंद करण्याबाबतची नोटीस इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना जारी केलीये. पहिल्या दोन नोटिशीत वेबसाइटवरील दोन निवडक युआरएल बॅन करण्यास सांगण्यात आलं होतं. तर तिसऱ्या नोटिशीत पूर्ण WeTransfer वेबसाइट बॅन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा- मोबाईल नंबर 11 अंकी होणार का? TRAI ने दिलं स्पष्टीकरण

WeTransfer या वेबसाइटद्वारे 2 जीबीपर्यंतच्या फाइल्स युजरच्या थेट ईमेलमध्ये झटपट आणि अगदी मोफत पाठवता येतात. तर, 2 जीबीपेक्षा मोठ्या फाइल सेंड करण्यासाठी पैसे आकारुन प्लॅन घ्यायला लागतो. पण बहुतांश युजर फ्री प्लॅनचाच वापर करतात. दरम्यान, सरकारने WeTransfer.com वर बंदी का घातली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, बहुतांश आघाडीच्या इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी WeTransfer ला बॅन केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Government of india bans wetransfer file sharing website sas

Next Story
राजेंद्र धवन
ताज्या बातम्या