Sexual Cannibalism : निसर्ग हा अंत्यत सुंदर आहे आश्चर्यचकारक आहे. निसर्गामध्ये अस्तित्वात असलेला प्रत्येक सजीव जगण्यासाठी संघर्ष करतात. एका प्राण्याचे जीवन हे दुसर्‍याच्या मृत्यूचे कारण ठरते. प्राण्यांच्या जगात अनेकदा जीवन आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, अशा अनेक प्रजाती आहेत जिथे एक जोडीदार, सहसा मादी, लैंगिक संबधानंतर किंवा दरम्यान दुसर्‍या जोडीदाराला खातात किंवा मारून टाकतात. या वर्तनाला ‘लैंगिक नरभक्षण’ (Sexual Cannibalism) म्हणून ओळखले जाते. हे अनोखे वर्तन निसर्गाच्या क्रूरतेवर प्रकाश टाकते. हे वर्तन धक्कादायक आहे पण ते पोषण मिळण्यापासून ते यशस्वी प्रजनन सुनिश्चित करण्याचा आश्चर्यकारक हेतू साध्य करते. असे प्राणघातक वर्तन असलेल्या काही प्राण्यांवर एक नजर टाकूया.

लैंगिक संबंधानंतर आपल्या जोडीदाराला मारून टाकणारे प्राणी (Animals that kill their partners after sex)

१. प्रेइंग मेंटिस (Praying mantises)

प्रेइंग मेंटिसमधील लैंगिक नरभक्षणाबाबत चांगले दस्तऐवजीकरण (well-documented) केले गेले आहे. या प्रजातीतील मादी नर जोडीदाराला संभोग करताना किंवा नंतर खातात. हे वर्तन बंदिवासात आणि जंगलात दोन्ही ठिकाणी निवास करणाऱ्या प्रजातींमध्ये दिसून येते. अभ्यासातून असे दिसून आले आहे, “ही कृती अतिरिक्त पोषक घटक देऊन, मादीच्या प्रजननातील यशात वाढ करू शकते.”

२. रेडबॅक स्पायडर (Redback spiders)

रेडबॅक स्पायडर (Latrodectus hasselti) प्रजातीच्या मादी वारंवार लैंगिक नरभक्षण करतात. नर बहुतेकदा लैंगिक संबंधादरम्यान मादीच्या तोंडात घुसतात. त्यांच्या या कृतीमुळे मादीला त्यांना खाणे सोपे जाते. या आत्मत्यागी वर्तनामुळे संभोगाच्या कालावधीसह गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता वाढते.

३. ब्लॅक विडो स्पायडर ( Black widow spiders)

ब्लॅक विडो हे नाव कदाचित असे सूचित करेल, “हे कोळी नेहमीच त्यांच्या जोडीदारांना खातात; परंतु हे सर्व प्रजातींसाठी खरे नाही.” काही ब्लॅक विडो स्पायडरचे वर्तन असे असते; पण काहींमध्ये हे वर्तन क्वचितच दिसते. हे वर्तन बहुतेकदा विशिष्ट प्रजाती आणि वातावरणावर अवलंबून असते. म्हणून ब्लॅक विडो हे नाव थोडेसे दिशाभूल करणारे असू शकते.

४. ब्यु लाईन ऑक्टोपस (Blue-lined octopuses)

ब्ल्यू लाइन्ड ऑक्टोपस (Hapalochlaena fasciata यांनी त्यांना मोठ्या नरभक्षक माद्यांनी खाऊ नये म्हणून एक अनोखी रणनीती विकसित केली आहे. ते संभोगादरम्यान मादीमध्ये एक शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन, टेट्रोडोटॉक्सिन इंजेक्ट करतात, ज्यामुळे तिला तात्पुरत्या स्वरूपात अर्धांगवायू होतो आणि नरभक्षण होणे टाळले जाते.

५. नर्सरी वेब स्पायडर (Nursery web spiders (Pisaurina mira)

या प्रजातीमध्ये नरांना संभोगाच्या वेळी मादींकडून खाल्ले जाण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी नर मादीचे पाय रेशमाने गुंडाळतात, जेणेकरून तिला हालचाल करणे कठीण होईल आणि त्यामुळे नरभक्षण होण्याची शक्यता कमी होईल. हे वर्तन संभोगाच्या वेळी स्व-संरक्षणाच्या दृष्टीने केले जाते.

६. क्रॅब स्पायडर (Crab spiders (Misumena vatia)

क्रॅब स्पायडर प्रजातीमध्ये ‘लैंगिक नरभक्षण’ सामान्य आहे. वृद्ध नरांवर माद्यांकडून हल्ला होण्याची आणि त्यांना खाल्ले जाण्याची शक्यता जास्त असते; विशेषतः मिलन हंगामाच्या उत्तरार्धात जेव्हा मादी आक्रमकता वाढते.

७. ग्रीन अँड गोल्डन बेल फ्रॉग (Green and golden bell frogs)

अलीकडच्या निरीक्षणांमध्ये अशी काही उदाहरणे आढळून आली आहेत, जिथे मादी ग्रीन अँड गोल्डन बेल फ्रॉग (Litoria aurea) संभोगानंतर नर जोडीदाराला खाण्याचा प्रयत्न करते. व्हिडीओमध्ये कैद झालेल्या या वर्तनावरून असे दिसून येते की, जरी ते दुर्मीळ असल्याचे दिसून येत असले तरी या प्रजातीमध्ये लैंगिक नरभक्षण होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८. ग्रीन अ‍ॅनाकोंडा (Green anacondas)

ग्रीन अ‍ॅनाकोंडा (Eunectes murinus) प्रजातीची मादी संभोगानंतर नरांना खात असल्याचे आढळून आले आहे. असे मानले जाते की, या वर्तनामुळे माद्यांना गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले अतिरिक्त पोषक घटक मिळतात. परंतु, त्याबाबतचे तपशीलवार अभ्यास मर्यादित आहेत.