Should I Take Antibiotics For Green Mucus :आपल्यापैकी अनेक लोक हंगामी आजार आणि संसर्गाला बळी पडतो. सर्दी-पडसे होणे हे अगदी सामान्य आहे, पण आजकाल एक गोष्ट खूप त्रास देते ती म्हणजे कफ साचणे. यामुळे केवळ छातीत घट्टपणा जाणवत नाही, तर हिरवा कफ दिसल्यावर अनेकदा भीतीही वाटते. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती आणि प्रख्यात हृदयरोग शल्यचिकित्सक, डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी ‘हिरव्या कफा’शी आणि त्याच्या उपचारांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. हिरवा कफ झाल्यास अँटीबायोटिक्स घेणे आवश्यक आहे की नाही, यावर हा व्हिडिओ विशेषतः केंद्रित होता.
हिरवा कफ म्हणजे काय?
जेव्हा आपल्या श्वसनसंस्थेत संसर्ग होतो, तेव्हा कफ तयार होतो. सामान्यतः, कफाचा रंग पांढरा किंवा फिकट पिवळा असतो, परंतु जेव्हा संसर्ग अधिक गंभीर असतो, तेव्हा तो हिरवा किंवा घट्ट होऊ शकतो.
घशातून बाहेर पडणारा हिरवा चिकट कफ काय दर्शवतो?
हिरवा कफ अनेकदा हे दर्शवतो की, शरीर संसर्गाशी लढण्यासाठी पांढऱ्या रक्त पेशी तयार करत आहे. सर्दी, खोकला किंवा इतर श्वसनमार्गाच्या संसर्गामध्ये सहसा हिरवा कफ दिसून येतो.
हिरव्या कफामध्ये अँटीबायोटिक्स घेणे आवश्यक आहे का?
डॉ. नेने यांनी या मुद्द्यावर विशेष लक्ष दिले आणि स्पष्ट केले की, हिरव्या कफाचा अर्थ नेहमीच जिवाणू संसर्ग असतो असे नाही. बहुतेक लोकांना वाटते की,”जेव्हा कफ हिरवा होतो, तेव्हा त्यांना अँटीबायोटिक्सची गरज असते, परंतु हा एक सामान्य गैरसमज आहे.”
डॉ. नेने यांनी स्पष्ट केले की,”बहुतेक प्रकरणांमध्ये, हिरवा कफ हा सर्दी किंवा फ्लू सारख्या विषाणूमुळे(Virus) होतो आणि अँटीबायोटिक्सचा विषाणूवर कोणताही परिणाम होत नाही. अँटीबायोटिक्स केवळ जिवाणू (Bacteria) संसर्गासाठी प्रभावी असतात. म्हणून, केवळ कफाच्या रंगावरून अँटीबायोटिक्स घेण्याचा निर्णय घेणे योग्य नाही.
डॉक्टरांकडून सल्ला कधी घ्यावा?
जरी हिरव्या कफाचा अर्थ नेहमीच गंभीर संसर्ग असा होत नसला तरी, तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:
- अनेक दिवस टिकणारा उच्च ताप.
- श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत जडपणा जाणवणे.
- कफातून रक्तस्त्राव होणे.
- खोकला किंवा कफ १०-१२ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहणे.
- दमा किंवा सीओपीडी (COPD) सारखा कोणताही पूर्वीचा गंभीर श्वसनविकार.
अँटीबायोटिक्सचा गैरवापर
डॉ. नेने यांनी व्हिडिओमध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित केला की, अँटीबायोटिक्सचा अतिवापर. ते म्हणाले की “अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे अँटीबायोटिक प्रतिरोध वाढतो. यामुळे भविष्यातील संसर्गावर उपचार करणे कठीण होऊ शकते, कारण जिवाणू अँटीबायोटिक्सचा प्रभाव निष्प्रभ करायला शिकतात.”
नैसर्गिक उपचार आणि काळजी:
- भरपूर पाणी प्या.
- आराम करा आणि शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी वेळ द्या.
- सूप किंवा आले-तुळशीच्या चहासारखे हलके गरम पदार्थ कफ पातळ करून आराम देऊ शकतात.
- आवश्यक असल्यास, डॉक्टरांनी शिफारस केलेली ओव्हर-द-काउंटर औषधे वापरा.
डॉ. नेने यांच्या व्हिडिओने हिरवा कफ आणि अँटिबायोटिक्सबद्दल लोकांमध्ये असलेले अनेक गैरसमज दूर केले आहेत. प्रत्येक वेळी हिरवा कफ दिसल्यावर अँटिबायोटिक्स घेणे आवश्यक नाही. लक्षणांकडे लक्ष देणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे हा योग्य उपाय आहे. जर एखाद्याला दीर्घकाळ म्हणजे साधारण ५-६ दिवस खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
अँटिबायोटिक्सचा वापर विचारपूर्वक आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केला पाहिजे, जेणेकरून आपण अँटिबायोटिक रेझिस्टन्ससारख्या मोठ्या
