आजवर तुम्ही लाल टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे ऐकले असतील. विशेषतः जर का आपण वजन कमी करण्याच्या मिशन वर असाल तर तुमच्या डाएट मध्ये लाल टोमॅटो आवर्जून खातही असाल. मात्र हिरवे टोमॅटो खाण्याचे फायदे तुम्हाला माहितेयत का? व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्सचा खजिना असणारा हिरवा टोमॅटो तुम्हाला विविध आजारांपासून दूर ठेवू शकतो. इतकेच नव्हे तर रक्ताचे विकार सुद्धा बरे करण्यात हा हिरवा टोमॅटो बराच कामी येतो. आज आपण या हिरव्या टोमॅटोच्या लोणच्याची एक घरगुती रेसिपी पाहणार आहोत. रोजच्या भाजीला कंटाळला असाल तर एकदा ही आरोग्यवर्धक व तरीही टेस्टी रेसिपी आवर्जून करून पहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिरव्या टोमॅटोचे लोणचे करण्यासाठी बाजारातून हिरवेगार टोमॅटो आणायचे आहेत. शक्यतो थोडे कडक टोमॅटो घ्या. बाजारातून आणल्यावर या टोमॅटोच्या आवडीनुसार लहान किंवा माध्यम फोडी करून घ्या.

जेवणानंतर शतपावली शक्य नाही? बसल्या जागी करा ‘हे’ उपाय; गॅस, अपचनावर रामबाण

साहित्य

  • लोणच्याची मोहरी किंवा मोहरीचे तेल
  • लसूण पेस्ट
  • कडीपत्ता
  • अक्खी लाल मिरची
  • सैंधव मीठ
  • काळी मिरी
  • लिंबाचा रस

कृती:

  • सर्वात आधी एका पॅन मध्ये थोडे तेल घ्या.
  • तेल तापल्यावर त्यात कडीपत्ता, अक्खी लाल मिरची, टेबलस्पून मोहरी आणि लसूण पेस्ट घाला.
  • ही सामग्री चांगली तडतडून घ्या
  • १ मोठा चमचा चण्याची डाळ, व अर्धी वाटी वाटलेल्या खोबरे घाला.
  • मसाले घालून टोमॅटोच्या फोडी टाका.
  • यानंतर लिंबाचा रस व मीठ घालून फोडी शिजुद्या.
  • चवीसाठी थोडी साखर किंवा गूळ घालू शकता.
  • फोडी हलक्या मऊसर झाल्यावर गॅस बंद करा.

Home Remedies For Low BP: कमी रक्तदाबाच्या समस्येवर दूध ठरेल रामबाण उपाय; सेवन करताना फक्त एवढं करा

हिरव्या टोमॅटोचे फायदे

हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं हिरवे टोमॅटो खाल्ल्यानं डोळ्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. हिरव्या टोमॅटोमध्ये पोटॅशियम अधिक असल्याने याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. हिरवे टोमॅटो त्वचेसाठीही फायदेशीर असतो, हा एक नैसर्गिक अँटी एजिंग घटक आहे, यातील व्हिटॅमिन सी मुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के असल्याने याचे सेवन केल्यास रक्ताची द्राव्यता समान राहते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green tomato pickle benefits for eyes and bp try easy homemade recipe svs
First published on: 18-08-2022 at 20:31 IST