Diabetes and Guava leaf: खाण्यापिण्याच्या सवयी आणि शारीरिक व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाचा प्रसार सध्या देशात झपाट्याने होत आहे. आज जवळजवळ प्रत्येक चौथा व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार शरीराला आतून हळूहळू नष्ट करतो. म्हणूनच या आजाराला स्लो डेथ असेही म्हणतात. पेरू खायला अनेक लोकांना आवडतो. पण तुम्हाला माहित आहे का की पेरूचे अनेक औषधी आणि चमत्कारिक आरोग्य फायदे देखील आहेत.

पेरू हे फळ आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकीच त्याची पानेही खूप फायदेशीर आहेत. पेरूच्या पानांचा वापर अनेक रोगांवर औषध म्हणूनही केला जातो. पेरूच्या पानांचा अर्क पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासोबतच ते अॅलर्जीची समस्याही दूर करते. याशिवाय पेरूची पाने उकळवून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

पेरू मधुमेहासाठी फायदेशीर आहे का?

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने मान्यता दिलेल्या ब्रेथ वेल बीइंगनुसार, पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. याचा अर्थ असा होतो की त्याचे पचन आणि शोषण मंद गतीने होते आणि त्यामुळे हळूहळू ग्लुकोजच्या वाढीवर परिणाम होतो. पेरूमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जास्त वजन हा मधुमेहाचा एक घटक आहे. USDA च्या मते, सुमारे १०० ग्रॅम पेरूमध्ये ९ ग्रॅम नैसर्गिक साखर आणि फक्त ६८ कॅलरीज असतात. पेरूमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि ते मधुमेहासाठी आवश्यक असलेल्या आहारातील एक गरज पूर्ण करते.

पेरूमध्ये भरपूर फायबर असते. सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी हे उत्तम आहे. याशिवाय, पेरूमध्ये संत्र्यापेक्षा चारपट व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, हे शरीराला मधुमेहासारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांशी लढण्यास मदत करते.

( हे ही वाचा: लघवीद्वारे खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ४ पदार्थ? डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची पद्धत)

पोषक तत्वांनी समृद्ध

हेल्थलाइनच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी पेरूच्या उत्पादनांचे सेवन करावे, ज्यांच्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी आहे. अशा परिस्थितीत पेरूचे सेवन आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. वास्तविक पेरूमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळतात. जे इन्सुलिनच्या उत्पादनात मदत करून मधुमेहाचा धोका टाळतात. हे गोड फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरू शकते. हे फळ खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

पेरूच्या पानांचा चहा कधी प्यावा?

आयुर्वेदानुसार पेरूच्या पानांचे अनेक औषधी उपयोग आहेत. सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात पेरूची पाने उकळून त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरूच्या पानांमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, सूक्ष्म पोषक घटक असतात. ब्रेथ वेल बीइंगनुसार पेरूची पाने उकळत्या पाण्यात टाकून पेरूचा रस काढला जातो. हे अर्क अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध आहेत. पेरूच्या पानांचा अर्क इंसुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारतो, ग्लुकोजची पातळी नियंत्रित करतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुधारतो.

( हे ही वाचा: लसूण खाल्ल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होईल; फक्त खाण्याची पद्धत जाणून घ्या)

रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त

NCBI मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, पेरूच्या पानांचे पाणी खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी प्रभावी आहे. ज्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयविकार आहे त्यांच्यासाठी ही पाने फायदेशीर आहेत. हा धोका कमी करण्यासाठी त्याच्या पानांचा रस देखील खूप उपयुक्त आहे.