Draw a beautiful rangoli of Gudhi : गुढीपाढवा हा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण दरवर्षी घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केसा जातो. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा असा हा दिवस प्रत्येक घरात उत्साहात साजरा केला जातो.

गुढीपाढवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. नव वर्षाचं स्वागत उत्साह, आनंदाने केले जाते. घरोघरी गुढी उभारली जाते. या दिवशी दारी आंब्याचे तोरण बांधलं जाते, स्त्रिया दारात सुंदर रांगोळी काढतात. अनेक महिलांकडे सुंदर रांगोळी काढण्याचे कौशल्य असते त्यामुळे त्या कितीही अवघड रांगोळी सहज काढू शकतात. पणा काहींना गुढीची रांगोळी काढावी असे वाटते पण जमत नाही. काळजी करू नका येथे काही हटके टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सुरेख गुढीची रांगोळी काढू शकता.


गुढीचा रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला फक्त एक झारा आवश्यकता आहे. झारा वापरून कोणीही गुढीची रांगोळी सहज काढू शकते.

कशी काढावी गुढीची रांगोळी?

प्रथम दारासमोर जिथे रांगोळी काढायची आहे तिथे एक झारा पालथा ठेवा. रांगोळीचा पिवळा रंग घेऊन प्रथम झाराच्या गोलकार भागाभोवती रांगोळी टाकून घ्याय आणि रांगोळीचा गुलाबी रंग वापरून झाऱ्याच्या दांड्याभोवती रंग टाका. त्यानंतर हळूवारपणे झारा उचला.

आता एक छोटी काचेची पट्टी घेऊन गोलाकार भागाला तांब्याचा षटकोनी आकार द्या.त्यानंतर गोलाखाली आडवी रेख दिसेल अशी पिवळा रंगाची रांगोळी टाका. गोलाकार आकाराच्यामधोमध गडद केसरी अन् फिक्कट पिवळा रंग भरा आणि मधोमध लाल रंग वापरून सरळ स्वस्तिक काढा. हा आकार गुढीवर ठेवलेल्या तांब्यासारखा दिसेल तर झाऱ्याच्या दांड्याचा जो आकार काढला आहे तो गुढीच्या काठीप्रमाणे दिसेल.

गुढीच्या काठीसारख्या दिसणाऱ्या भागात केसरी रंग भरा. आता जिथे तांब्या आणि काठी एकमेकांशी जोडले आहेत तिथून निळ्या रंगाने रेघ ओढा आणि निऱ्यांसारख्या दिसतील अशा आकारात एकमेकांना जोडा. त्यात निळा रंग भरा. त्याखाली पिवळा रंगाने साडीची काठ काढा. निळ्या रंगावर पिवळ्या रंगाचे ठिपके द्या.

आता गुढीला वापरण्यात येणारे आंब्याच्या पानांचे तोरण दाखवण्यासाठी गुढीच्य तांब्याच्याबरोबर खाली थोडे साडीवर येतीलअसे हिरव्या रंगाचे छोटे छोटे ठिपके एकमेकांशेजारी काढा, आणि पेन्सिलने ठिपक्यांच्या मधोमध छोटी रेघ ओढून त्याला पानांचा आकार द्या.

पानांची माळ झाल्यानंतर त्याखाली पांढरी रांगोळी घेऊन छोटे छोटे ठिपके एकमेकांना माळेसारखे जोडून काढा. अलगदपणे बोटाने तो जागीच दाबा. अशा प्रकारे तुमची गुढीला लावण्यात येणारी साखरेची गुढी तयार होईल.

आता झेंडूच्या फुलांची माळ दाखवण्यासाठी साखेरच्या माळेच्या खालीच केसरी आणि पिवळ्या रंग वापरून माळेच्या आकारात छोटे ठिपके काढा. पेन्सिलच्या टोकाने ठिपका जागच्या जागी चकलीसारख्या आकारात गोल फिरवा जेणे करून ते झेंडुच्या फुलांसारखे दिसेल.या माळेच्या मध्ये चिमटीने हलकासा हिरवा रंग टाका जो आंब्याच्या पानांचा वापर केल्यासारखे दिसेल.

आता शेजारी कोणताही रंग टाकून त्यावर गुढी पाडवा पांढऱ्या रांगोळीने तयार लिहा. गुढीपाडव्यासाठी स्पेशल गुढीची रांगोळी तयार आहे. rangoli_by_madhuri_vanawe या पेजवर तुम्ही ही रांगोळी पाहू शकता.