Gudi Padwa Rangoli: हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण घरोघरी गुढी उभारतात.

या नवीन वर्षाची गोड सुरूवात म्हणून गुढीच्या बाजुला तसेच दाराबाहेर रांगोळी काढली जाते. प्रत्येक गृहिणीली, स्त्रीला आपल्या दारातली रांगोळी ही छान आणि हटके अशी हवी असते. आपला कोणताही सण रांगोळीशिवाय पूर्ण होत नाही. तुम्हालाही गुढीपाडव्यानिमित्त दारात सगळ्यापेक्षा हटके रांगोळी काढायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी रांगोळीच्या काही सोप्या आणि हटके डिझाईन्स आज आपण पाहणार आहोत.

ही एकदम सोप्या पद्धतीने काढलेली गुढी पाडव्याची रांगोळी आहे. @chaitali_art_n_crafts या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गुढीपाडव्यानिमित्त खास रांगोळीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

ही रांगोळी अगदी अनोख्या पद्धतीने काढलेली आहे. चमच्याचा वापर करून कठीण काम सोप्प केलं आहे. तुम्हीदेखील अशाच पद्धतीने हुबेहूब रांगोळी काढू शकता. @divyah.rangoli या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

गुढीपाडवा विशेष सोपी आणि सुरेख रांगोळी या व्हिडीओत काढून दाखवलेली आहे. लहान वाटी, पट्टी आणि अगरबत्तीच्या काडीचा वापर करून ही रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने काढली आहे. इन्स्टाग्रामवरील @rangitrangoli या अकाऊंटवरून रांगोळीची रील शेअर केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलीली आणखी एक सुरेख रांगोळी या व्हिडीओत दाखवलेली आहे. मोठी दिसणारी रांगोळी पण अगदी काही मिनिटांतच काढून होईल अशा पद्धतीने दाखवली आहे. @rangolibysakshi_official या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

रांगोळी कशी काढायची कळत नसेल. किंवा जास्त कठीण रांगोळी जमत नसेल तर ही सोप्या पद्धतीची रांगोळी तुम्ही नक्कीच काढू शकता. डाळीच्या चमच्याचा वापर करून इथे रांगोळी काढली आहे. ही रांगोळी @rangoli_by_madhuri_vanawe या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.

घरातील लहान मोठ्या वस्तूंचा वापर करून रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो यासाठीच हा व्हिडीओ आहे. बांगड्या, चमच्याचा वापर करून कठीण काम अगदी सोप केलेलं दिसत आहे. अशीच सुरेख रांगोळी तुम्हीही काढू शकता. दरम्यान, हा व्हिडीओ @vibhas_art_and_craft_studio या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.