Gudi Padwa 2026 Wishes in Marathi: दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा आहे. साडेतीन मुहूर्तांपेकी एक म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या सणाच्या निमित्ताने घरोघरी उंच गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. त्यानुसार यंदा गुढीपाडव्याचा सण १९ मार्च २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून घरावर गुढी उभारून स्वादिष्ट अन्नपदार्थ, गोडधोड बनवून कुटुंबासह या सणाचा आनंद घेतला जातो. दाराबाहेर सुंदर फुलांचं तोरण लावलं जातं, रांगोळी काढली जाते. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय, उत्साही वातावरण पाहायला मिळते. तसेच, घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, घराला चांगलं आरोग्य लाभावं आणि येणारं नवं वर्ष आनंदात आणि सुखात जावं यासाठी प्रार्थना केली जाते.
सण-समारंभ म्हटला की, नातेवाइकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देणं आलंच. तर यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाराला शुभेच्छा पाठवून, त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.
गुढीपाडवा आणि मराठी वर्षाच्या शुभेच्छा (Gudi Padwa 2026 Wishes in Marathi)
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्यावर चांदीचा लोटा,
उभारूनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा सण मोठा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी,
नवे नवे वर्ष आले,
घेऊन गुळासाखरेची गोडी,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

नेसून साडी माळून गजर उभी राहिली गुढी,
नववर्षाच्या स्वागताची ही तर पारंपरिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन,
नूतन वर्षाभिनंदन!

सुरू होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नववर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या मराठी शुभेच्छा संदेश (Happy Gudi Padwa Wishes In Marathi)
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नववर्ष आज शुभ दिनी,
सुख-समृद्धी नांदो जीवनी.
गुढीपाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरुवात…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरुवातीसोबत,
चैत्र ‘पाडवा’ दारी आला…
गुढीपाडवा अन् नूतन वर्षाभिनंदन!
