पुरुषोत्तम आठलेकर

चैत्र मास प्रारंभ आणि प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा नववर्षांचा सण आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.   गुढीपाडवा म्हटलं की नवीन घर, गृहप्रवेश, वास्तुशांत यांसारखे धार्मिक विधी हे योगाने आलेच. पण घर खरेदी करताना आणि त्याचा ताबा मिळाल्यानंतर या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा आपण प्लॅन करून त्याप्रमाणे नियोजन करत असतो. परंतु साधारण मागील दोन दशकांपूर्वीची घर घेण्याची एक सर्व सामान्यांची मानसिकता आणि अलीकडील पिढीची मानसिकता यांमध्ये परिस्थिती आणि वस्तुस्थितीनुसार फार मोठा फरक आहे. पूर्वी घराची निवड जरी महत्त्वाची असली    तरी आर्थिक नियोजन हेच केंद्रस्थानी होते. त्यामुळे तडजोड करणे क्रमप्राप्त होते. परंतु आताच्या पिढीमध्ये जास्तीत जास्त मोठा कॉम्प्लेक्स व सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गृहसंकुलांना पसंती देण्याचा कल मोठय़ा प्रमाणावर वाढलेला आहे. तसेच प्रथम घर घेणाऱ्यास पंतप्रधान आवास योजनेमधून मिळणारे अर्थसा तसेच महारेरा कायद्यामुळे घरग्राहकाची होणाऱ्या फसवणुकीला चाप बसला आहे.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

 घर घेण्यासाठी अर्थसा करणाऱ्या विविध बँका व होम फायनान्सारख्या संस्थासुद्धा त्यांच्या सेवा घरपोच देण्यास तत्पर असतात. त्यामुळे योग्य त्या आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आता घर घेणे सुलभ आणि सोपे होऊ लागले आहे. तसेच ठरावीक कालावधीत घराचा ताबा मिळणार असल्यामुळे गुढीपाडव्यासारख्या शुभ व मंगलदिनी आपण कलश पूजन, गणेश पूजन किंवा वास्तुशांत यांसारखे धार्मिक विधी करून आनंदाने गृहप्रवेश करून आपण आपल्या नवीन वास्तूत सुखाने, समाधानाने नवीन आयुष्याची सुरुवात करण्यास तत्पर होतो.