Gudi Padwa 2022 : गेल्या दोन वर्षांपासून करोनाची साथ आणि त्याअनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सणांवर निर्बंध टाकण्यात आले होते. त्यामध्येच गुढी पाडव्याचा देखील समावेश होता. मात्र, यंदा गुढी पाडव्यापासूनच म्हणजेच आजपासूनच राज्यातील करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. शिवाय, मास्कची सक्ती देखील हटवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, दादर, गिरगाव, डोंबिवली या भागात गुढी पाडव्याच्या शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे.

Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
unseasonal rain in maharashtra
राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट
divyang survey marathi news, maharashtra divyang survey marathi news
राज्यात तीस वर्षांनी दिव्यांग सर्वेक्षणाला मुहूर्त… होणार काय?
Live Updates
10:54 (IST) 2 Apr 2022
गिरगावात गुढीपाडवा शोभायात्रेची धूम!

https://youtu.be/SlebpgWc3B0

09:18 (IST) 2 Apr 2022
डोंबिवलीत दोन वर्षांनंतर शोभायात्रा!

08:49 (IST) 2 Apr 2022
गिरगावात पारंपरिक वेशभूषा आणि बुलेट यांची सांगड!

08:45 (IST) 2 Apr 2022
देवेंद्र फडणवीसांनीही दिल्या शुभेच्छा!

“श्रीराम नवमीच्या महोत्सवाची देखील सुरुवात एकप्रकारे आजपासून आपण केली आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. की या संपूर्ण करोनाच्या काळात आपले आराघ्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी, यांच्या जन्मस्थानासाठी ५०० वर्षे आपण सर्वांनी संघर्ष केला. त्या प्रभू श्रीरामाचं मंदिर हे अयोध्येला ज्या ठिकाणी रामलल्लाचा जन्म झाला, त्याच ठिकाणी बांधण्यासाठी त्याचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि आज भव्य मंदिराचं निर्माण हे त्या ठिकाणी होतय. ही आपल्या सारख्या सगळ्या रामभक्तांसाठी देखील अतिशय अभिमानाची गोष्ट आहे”, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

08:43 (IST) 2 Apr 2022
गिरगावात गुढी पाडव्याचा उत्साह! चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गिरगावमध्ये गुढी पाडव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठी गर्दी केली असून या ठिकाणी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये चित्ररथातून सामाजिक संदेश देण्यात देखील आले आहेत. तसेच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू महाराष्ट्र विधिमंडळ हा चित्ररथ ठरत आहे.