scorecardresearch

Gudipadwa 2022: गुढीपाडव्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, इमेज आणि व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर; शेअर करून करा नववर्षाचं स्वागत

चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण आहे. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते.

Gudhi_Padwa_maharstra5
Gudipadwa 2022: गुढीपाडव्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, इमेज आणि व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर शेअर करून करा नववर्षाचं स्वागत (संग्रहित फोटो)

चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण आहे. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी गुढीपाडवा २ एप्रिलला असून शनिवार आहे. या सणानिमित्त घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. रांगोळ्या, तोरणं, गोडाधोडाचं जेवण करून आनंद साजरा केला जातो. शुभ मुहूर्त असल्याने सोनं, नव्या वस्तू खरेदी केल्या जातात. ठिकठिकाणी शोभायात्रा काढून जल्लोषात स्वागत केलं जातं. एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. मात्र अनेकदा आपल्या नातेवाईक, मित्रांना भेटणं शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शुभेच्छा देता नाही. असं असलं तरी सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा पाठवून आनंदात सहभागी होऊ शकता. गुढीपाडव्यानिमित्त मराठी मॅसेज, शुभेच्छा, फोटो, व्हॉट्सअॅप स्टिकर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करू शकता.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

मराठीतील सर्व गुढी पाडवा ( Gudi-padwa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gudipadwa 2022 marathi wishes messages image stickers and gifs rmt

ताज्या बातम्या