scorecardresearch

गुणकारी गुलकंद खा, निरोगी राहा!

उन्हाळय़ात गुलकंदाच्या नियमित सेवनाने उष्माघात, घोळणा फुटणे, भोवळ येणे अशा त्रासापासून दूर राहता येते.

image source : wikimedia commons

नवी दिल्ली : आपल्या देशात विविध औषधी परंतु चविष्ट पदार्थाची रेलचेल आहे. ‘गुलकंद’ हा त्यापैकीच एक औषधी आणि तरीही चविष्ट पदार्थ. भोजनानंतर गुलकंदयुक्त चविष्ट पानाचा आस्वाद घेण्याची अनेकांना सवय असते. साखरेचा पाक आणि गुलाबपाकळय़ांनी तयार केलेला गुलकंद नियमित खाण्याचे विविध फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत.

आयुर्वेदतज्ज्ञांच्या मतानुसार गुलकंद हे आयुर्वेदिक शक्तिवर्धक औषध (टॉनिक) आहे. त्याच्या कॅल्शियमची भरपूर मात्रा असून, शरीराज्ल विषद्रव्ये नष्ट करण्याची क्षमता गुलकंदात असते. सर्व प्रकृतीच्या व्यक्तींना गुलकंद लाभदायक असते. विशेषत: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी गुलकंद लाभदायक असतो. आम्लपित्त, अपचन, पोटविकार, त्वचेची निगा, पोटातील व्रण, नाकातील रक्तस्राव, तणावावर गुलकंद लाभदायक असतो. शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर काढण्यासाठी गुलकंद उपयोगी ठरतो. खाज, फोड, सुरकुत्या आणि पुरळांवरही गुलकंद गुणकारी आहे. वृद्धत्वाची गती मंद करून तारुण्य राखण्याचे गुण गुलकंदात नैसर्गिकरीत्या आहेत. त्यामुळे आपल्याला चांगली ऊर्जा मिळते. छातीतील जळजळ, बद्धकोष्ठ, पोटातील गंभीर व्रणाची लक्षणे (अल्सर) सौम्य करण्यासाठी गुलकंदाचा उपयोग होतो. उन्हाळय़ात गुलकंदाच्या नियमित सेवनाने उष्माघात, घोळणा फुटणे, भोवळ येणे अशा त्रासापासून दूर राहता येते. मासिकपाळीतील अतिरिक्त रक्तस्राव गुलकंदाने थांबण्यास मदत होतो. गुलकंदामुळे शरीराला शर्करा मिळाल्याने ऊर्जा मिळते. रक्तक्षय आणि रक्त शुद्धीकरणात गुलकंद साहाय्यक ठरतो. गुलकंदामुळे आपल्या शरीरातील चयापचय प्रक्रिया उत्तम होते. गुलकंद शक्तिवर्धक असल्याने आपण निरोगी आणि कार्यक्षम राहतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gulkand benefits health benefits of gulkand zws

ताज्या बातम्या