Guru Purnima Wishes 2026 : भारतीय संस्कृतीत गुरुंना देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. आषाढ पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक, तसेच जीवनात योग्य वाट दाखवणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्या दृष्टीने गुरुच असते. त्यांच्या ज्ञानामुळे, संस्कारांमुळे आणि प्रेरणेमुळे जीवन अधिक समृद्ध व यशस्वी बनते.

यंदा २९ जुलै रोजी देशभरात उत्साहात गुरुपोर्णिमा साजरी केली जाईल. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुंचे आशीर्वाद घेणे, त्यांचे आभार मानणे आणि मनापासून शुभेच्छा देणे ही आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा आहे. या खास दिवशी सोशल मीडियावर आपल्या गुरुंना प्रेम, आदर आणि कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करणारे संदेश नक्की पाठवा.

गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा संदेश (Wishes and Message Of Guru Purnima)

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima Wishes in Marathi
गुरुपौर्णिमेनिमित्त पाठवा या सुंदर चारोळ्या आणि शुभेच्छा! (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हिऱ्याप्रमाणे व्यक्तिमत्वाला पैलू पाडतो तो गुरु,
जीवनाला योग्य दिशा देतो तो गुरु,
आयुष्यातील खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा
गुरु पौर्णिमेला ५६ वर्षांनंतर जुळून आला दुर्लभ राजयोग, ‘या’ ६ राशींचे नशीब उजळणार

गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima Wishes in Marathi
गुरुपौर्णिमेनिमित्त पाठवा या सुंदर चारोळ्या आणि शुभेच्छा! (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गुरू जगाची माऊली,
जणू सुखाची सावली
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

होवो गुरु चरणाचे दर्शन,
मिळे आनंदाचे अंदन! !
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

ज्ञानाचा दीप लावणारे,
अंधारातही योग्य दिशा दाखवणारे,
अपयशाचे यशात रूपांतर करणारे,
आणि जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्गदर्शक ठरणारे…
असे सर्व माझ्या गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima Wishes in Marathi
गुरुपौर्णिमेनिमित्त पाठवा या सुंदर चारोळ्या आणि शुभेच्छा! (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्यांनी मला घडवलं,
या कठीण जगात लढायला शिकवलं…
चुकताना थांबवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं,
आणि या जीवनात खऱ्या अर्थानं ‘जगायला’ शिकवलं…
अशा माझ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

गुरू म्हणजे अंधारात प्रकाशाचा किरण,
गुरू म्हणजे वाट चुकल्यावर योग्य मार्गदर्शन,
या पवित्र दिवशी गुरूंना करूया स्नेह अर्पण ,
त्यांच्या कृपाछायेतच होऊ दे सुंदर जीवन
या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना शतशः वंदन!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima Wishes in Marathi
गुरुपौर्णिमेनिमित्त पाठवा या सुंदर चारोळ्या आणि शुभेच्छा! (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्ञानाचा दीप गुरूने पेटविला,
अंधार सारा दूर केला,
गुरूच्या कृपेच्या सावलीत,
जीवनाचा अर्थ उमजला
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु म्हणजे श्रद्धेचा श्वास,
गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश.
तुमच्या आशीर्वादाने सदैव,
उजळो आमचा जीवनप्रवास.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima Wishes in Marathi
गुरुपौर्णिमेनिमित्त पाठवा या सुंदर चारोळ्या आणि शुभेच्छा! (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नाही मोजता येणार ऋण,
नाही फेडता येणार मोल.
गुरुंच्या चरणी सदैव राहो,
माझा नम्र प्रणाम अनमोल.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!