दिवाळी तोंडावर आली असल्याने बाजारात सध्या खरेदीची लगबग सुरु झाली आहे. नवनवीन कपडे, इलेक्टॉनिक्स वस्तूंची खरेदी करण्याचा विचार तुम्हीही करत असाल तर, यंदाच्या वर्षी दिवाळीपूर्वीत वस्तू खरेदीसाठीचे मुहूर्त आले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच तुम्ही प्रॉपर्टी, ज्वेलरी आणि वाहनांची खरेदी केलीत तर ती लाभदायक ठरु शकेल. डिजिटल मार्केटिंग फर्म InMobi च्या अहवालानुसार, एक भारतीय व्यक्ती हा सणासुदीच्या काळात खरेदीसाठी सरासरी २१ हजार रुपये खर्च करत असतो. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी असा योग तयार होत आहे, ज्यामध्ये खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. कोणते आहेत हे शुभ दिवस आणि काय आहेत याचे फायदे जाणून घेऊयात सविस्तर…

Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
woman who went for a morning walk in Dombivli has been missing for twelve days
डोंबिवलीत सकाळी फिरण्यासाठी गेलेली महिला बारा दिवसांपासून बेपत्ता
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु

यंदा दिवाळी ४ नोव्हेंबरला आहे, त्याआधी पुष्य नक्षत्र २८ ऑक्टोबरला येत आहे. विशेष म्हणजे तब्बल ६० वर्षानंतर हा संयोग तयार होत असून या नक्षत्राला खरेदी आणि गुंतवणुकीचा महामुहूर्त असंही म्हणतात. त्याहूनही आणखी एक विशेष बाब म्हणजे या वर्षी गुरू पुष्य नक्षत्रात तीन महा संयोग तयार होत आहेत. अमृत योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग हे तीन योग तयार होत आहेत. ज्योतिषींच्या म्हणण्यानुसार, हा महासंयोग हा क्वचितच तयार होतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळीच्या खरेदीसाठीचे शुभमुहूर्त खूपच खास असणार आहेत. या खास महासंयोगामुळे यंदाच्या दिवाळीची खरेदी तुम्हाला दिवाळीपूर्वीच करता येणार आहे.

२८ ऑक्टोबर रोजी पुष्य नक्षत्राच्या दिवशी मकर राशीत शनि-गुरूची युती होणार आहे. या युतीमुळे पुष्य नक्षत्राची शुभता आणखी वाढणार आहे. त्याच दिवशी सकाळी ६.३३ ते ९.४२ पर्यंत सर्वार्थसिद्धी योग असणार आहे. त्यामुळे या काळात दिवाळीची खरेदी केल्यास हा योग अधिक फायदेशीर असणार आहे, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर दिवसभर रवियोगही असणार आहे. या दिवशी कोणतीही खरेदी करायल तर ती शुभ असणार आहे. प्रॉपर्टी, फर्निचर, लाकडापासून बनविलेल्या वस्तूंची खरेदी शुभ ठरणार आहे.

गुरु-पुष्य नक्षत्रात या गोष्टींची गुंतवणूक करा: गुरु पुष्य नक्षत्रात काहीही खरेदी करता येतं. परंतु या नक्षत्रात सोन्याच्या वस्तू आणि वाहने खरेदी केल्याने शुभ फळ मिळतात. वास्तविक, गुरु ग्रह हा पिवळ्या वस्तूंचा कारक आहे, तर शनि ग्रह हा लोहाचा कारक आहे. या दिवशी या वस्तू खरेदी केल्यास दीर्घकालीन लाभ मिळतो.

या व्यतिरिक्त, तुमची इच्छा असल्यास, मालमत्ता इत्यादीमध्ये देखील गुंतवणूक करू शकता. या दिवशी घर, प्लॉट, फ्लॅट किंवा दुकान बुक करणं शुभ मानलं जातं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही भांडी, मेकअपच्या वस्तू, दागिने आणि स्टेशनरीच्या वस्तूही खरेदी करू शकता.

हा योग ६० वर्षांपूर्वी तयार झाला होता: यापूर्वी बरोबर ६० वर्षापूर्वी १९६१ मध्ये पुष्य नक्षत्रचे स्वामी गुरू आणि उपस्वामी शनीची मकर राशीत युती घडली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी हा खास संयोग जुळून येतोय.

सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग: गुरु-पुष्य योगाबरोबरच २८ ऑक्टोबर रोजी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग देखील तयार होत आहेत. या योगांमध्ये केलेली सर्व कामे सिद्ध होतात. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.४२ पासून अमृत सिद्धी योग सुरू होईल, तर सर्वथा सिद्धी योग दिवसभर चालू राहील.