habits that could cause diabetes | Loksatta

आळसपणासह ‘या’ ६ सवयी वेळीच टाळा, अन्यथा मधुमेहाचा धोका वाढेल

जीवनशैलीमध्ये आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बदल केल्यास मधुमेहपासून बचाव होऊ शकतो. तसेच, काही सवयी या मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकतात. या सवयींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. आज या सवयींबद्दल जाणून घेऊया.

आळसपणासह ‘या’ ६ सवयी वेळीच टाळा, अन्यथा मधुमेहाचा धोका वाढेल
मधुमेह


देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. डॉक्टरांच्या मते चुकीची जीवनशैली ही मधुमेहांचे रुग्ण वाढण्यामागचे कारण आहे. टाईप १ मधुमेह हा अनुवांशिक आहे, मात्र टाईप २ मधुमेह हा अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे होतो. मात्र जीवनशैलीमध्ये आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केल्यास मधुमेहापासून बचाव होऊ शकतो. तसेच, काही सवयी या मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकतात. या सवयींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. आज या सवयींबद्दल जाणून घेऊया.

) पोषणाची कमतरता

शरीरात पोषक तत्वांची कमी झाल्यास केवळ मधुमेहच नवे तर इतर आजारही होऊ शकतात. फळे आणि हिरव्यागार पाले भाज्या न खाणाऱ्यांना मधुमेहाची समस्या होऊ शकते. त्याचबोरबर, दीर्घ कालावधीपर्यंत जीवनसत्व ब च्या कमतरतेने देखील मधुमेह होऊ शकतो. प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट आणि कार्बोहायड्रेटनी युक्त आहार घेतल्यास इन्सुलिनची पातळी आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते.

(सकाळी उठताना करा ‘या’ क्रिया, लवकर जाग येईल, दिवसही चांगला जाऊ शकतो)

२) व्यायाम न करणे

व्यायाम केल्याने श्वासोच्छवास प्रक्रिया चांगली राहाते. अनुवांशिक मधुमेह असलेल्यांना व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. व्यक्तीने आठवड्यातून कमीत कमी १५० मिनिटे किंवा पाच दिवस व्यायाम केला पाहिजे असे मानले जाते.

३) आळशी जीवनशैली

जे लोक क्रियाशील राहात नाही किंवा नेहमी लेटून असतात त्यांना मधुमेह होऊ शकतो. दीर्घकाळ निष्क्रिय राहिलेल्या व्यक्तीला हृदय आणि फुफ्फुसाची समस्या होऊ शकते. त्यामुळे आळस दूर करा आणि क्रियाशील राहा. असे केल्यास मधुमेहापासून बचाव होऊ शकतो.

(जिम जाण्याची घाई नडू शकते, ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या, मोठ्या संकटांपासून राहाल सुरक्षित)

४) उच्च कॅलरी असलेल्या आहाराचे सेवन

उच्च कॅलरीयुक्त आहाराच्या सेवनाने शरीरात चरबी वाढते, तसेच टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जेवढी कॅलरी तुम्ही बर्न करू शकता, तेवढीच कॅलरीचे सेवन झाले पाहिजे. कमी कॅलरी असलेल्या आहाराचे सेवन केले पाहिजे.

५) धुम्रपान

हृदयविकार, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार धुम्रपान आणि मद्यपान केल्याने होऊ शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. धुम्रपानाने रक्तवाहिन्या अंकुचन पावतात आणि त्याचा रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होतो, ज्याने मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

(मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय, फरक दिसून येईल)

६) वजन वाढणे

ज्या लोकांचे वजन अधिक असते त्यांना मधुमेहाचा धोका अधिक असतो, असा इशारा डॉक्टरांनी आधीच दिलेला आहे. त्यामुळे बीएमआई नेहमी विहित मर्यादेत ठेवा जेणेकरून मधुमहेचा धोका उद्भवणार नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Health Tips: तुम्ही गरम पाणी अशाप्रकारे पिता का? वाढू शकतो किडनी आणि मेंदूच्या समस्यांचा धोका, वेळीच सावध व्हा

संबंधित बातम्या

आरोग्य वार्ता : लठ्ठ महिलांना ‘लाँग कोविड’ची शक्यता अधिक
पहिल्यांदाच डेटवर जाताय..? मग पहिली भेट शेवटची ठरू नये म्हणून या गोष्टी एकदा वाचाच !
World Diabetes Day 2022: ‘या’ अवयवांमध्ये सूज येणे हे रक्तातील साखर वाढण्याचे धोकादायक लक्षण
बद्धकोष्ठता, मधुमेहावर ‘ही’ भाजी गुणकारी; आहारात करा समावेश
Period Rashes Tips: मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्समुळे येणाऱ्या रॅशेसने त्रस्त आहात? ‘अशी’ करा सुटका; मिळेल त्वरित आराम

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीचा ओघ; अलिबाग, मुरुड मतदारसंघात २५२ कोटींचा निधी
छत्तीसगड मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिवास ‘ईडी’कडून अटक; कोळसा घोटाळाप्रकरणी कारवाई
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा : मुंबई, कोल्हापूर केंद्रांमध्ये आजपासून प्राथमिक फेरी
आरोग्य वार्ता : लठ्ठ महिलांना ‘लाँग कोविड’ची शक्यता अधिक