Hair care : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या केसांची विशेष काळजी! ‘या’ टिप्स करा फॉलो

पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारचे संसर्ग पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.

Hair care : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या केसांची विशेष काळजी! ‘या’ टिप्स करा फॉलो
पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. (फोटो: pexeles)

पावसाळा ऋतु लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. विशेषत: मुलींना या ऋतूचा मनमोकळा आनंद घ्यायचा असतो. पण यासोबतच त्यांना त्यांच्या केसांची आणि त्वचेची चिंता देखील असते. कारण पावसात केस खराब होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. या ऋतूत कमीत कमी हेअर प्रोडक्ट्स वापरा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी याबाबत आपण जाणून घेणार आहोत. पावसाळ्यात केसांच्या होणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाय याबाबत जाणून घेऊया.

पावसाळ्यात केसांचे संरक्षण कसे करावे ?

१. पावसाळ्यात केसांमध्ये कमीत कमी उत्पादनांचा वापर करा. आपले केस स्वच्छ ठेवा आणि केस धुतल्यानंतर कंडिशनर लावा.

२. केस धुताना प्रत्येक वेळी कंडिशनर वापरा, पण ते टाळू आणि मुळांना लावण्याऐवजी केसांनाच लावा. यामुळे तुमचे केस गळणार नाही.

३. केस रोज धुवा आणि स्वच्छ ठेवा. केस धुतल्यानंतर थोडे कोरडे झाल्यावर सीरम लावा. यामुळे तुमच्या केसांचा ओलावा टिकून राहील आणि केस तुटणार नाहीत.

४. रोगप्रतिकारक शक्तीचा केसांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे प्रोटीनयुक्त पदार्थ खा. तसंच अधिक फळे , भाज्या खा आणि भरपूर पाणी प्या.

५. पावसाळ्यात केसांना कोमट तेलाने मसाज करा, कारण ते केसांना पोषण देते.

६. पावसाळ्यात हेअर ड्रायर वापरणे सहसा टाळा. परंतु, आवश्यक असल्यास फक्त केस कोरडे करा आणि ड्रायर टाळूपासून किमान साडेपाच इंच दूर ठेवून वापरा.

७. केसांवर केमिकलयुक्त उत्पादने वापरू नका, म्हणजेच केस सरळ आणि हायलाइट करणे टाळा.

८. पावसाळ्यात केस ओले होणार नाहीत याची काळजी घ्या. पावसाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पाण्यात , हवेत धूलिकण असतात, ज्यामुळे केस कमकुवत आणि निर्जीव होऊ शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आरोग्यवार्ता : चांगल्या जैविक लयीसाठी योग्य जीवनशैलीची गरज
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी