Hair Care Tips : ‘या’ घरगुती उपायांमुळे Split Ends पासून मिळणार सुटका; आजच वापरून पाहा सोप्या टिप्स

ज्यांचे केस लांब असतात त्यांना स्प्लिट एंड्सची समस्या भेडसावत असते. याचे कारण रसायनाने बनवलेले हेअर प्रोडक्ट, वाढती घाण आणि प्रदूषण असू शकते.

Hair Care Tips Get Rid Of Split Ends
या समस्येपासून कशी सुटका करून घ्यायची, हे आज आपण जाणून घेऊया. (Photo : Freepik)

महिला असो किंवा पुरुष, आजकाल प्रत्येकाला लांब केस ठेवायला आवडतात, परंतु हा छंद जोपासणे तितके सोपे नाही. यादरम्यान केस गळणे, केस कोरडे होणे यासारख्या समस्या येतात. केसांचे सौंदर्य कमी झाले तर त्याचा एकूणच आपल्या दिसण्यावर परिणाम होतो. केसांची काळजी घेताना अनेक अडचणी येतात, यातीलच एक अडचण म्हणजे केसांना फाटे फुटण्याची समस्या (Split Ends). यामध्ये आपल्या केसांच्या टोकाला दोन फाटे फुटलेले दिसतात. अशावेळी या समस्येपासून कशी सुटका करून घ्यायची, हे आज आपण जाणून घेऊया.

स्प्लिट एंड्सच्या समस्येपासून कशी मिळवायची सुटका?

ज्यांचे केस लांब असतात त्यांना स्प्लिट एंड्सची समस्या भेडसावत असते. याचे कारण रसायनाने बनवलेले हेअर प्रोडक्ट, वाढती घाण आणि प्रदूषण असू शकते. स्प्लिट एंड्सपासून मुक्त कसे व्हावे ते जाणून घेऊया.

  • सध्याच्या जमान्यात केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर अधिक होत आहे, त्यामुळे स्प्लिट एंड्सच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे केसांसाठी हर्बल शॅम्पू वापरणे आवश्यक आहे कारण त्यात रसायने नसतात.
  • पपईद्वारे तुम्ही स्प्लिट एंड्सपासून मुक्त होऊ शकता. यासाठी पपई बारीक करून त्यात दही घालून पेस्ट बनवा. ते टाळूवर चांगले लावा जेणेकरून ते मुळांमध्ये पूर्णपणे शोषले जाईल. हे नियमितपणे केल्यास इच्छित परिणाम दिसू लागतो.
  • टाळूला तेलाने मसाज करा आणि नंतर एक कॉटन टॉवेल कोमट पाण्यात बुडवून पिळून घ्या. हे टॉवेल केसांच्या भोवती गुंडाळा आणि काही वेळ असेच राहू द्या. जर तुम्ही ही प्रक्रिया २ ते ३ वेळा केली तर तुमची स्प्लिट एंड्सपासून सुटका होईल.
  • केळ्यामध्ये लोह, पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तुम्ही एक केळ घेऊन ते मॅश करा आणि केसांना लावा, नंतर थोड्या वेळाने हर्बल शॅम्पूने केस धुवा.
  • अंड्यांचा वापर करून, तुम्ही स्प्लिट एंड्सपासून मुक्त होऊ शकता. अंड्यातील पिवळ बलक केस मजबूत करण्यास मदत करतो.

Weight Loss Tips : गोड पदार्थ न सोडताही वजन कमी करता येणार; फॉलो करा ‘या’ टिप्स

स्प्लिट एंड्सपासून मुक्त होण्यासाठी आहारात बदल करा

  • केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी अंडी खाणे आवश्यक आहे कारण ते प्रथिने आणि बायोटिनचे स्त्रोत आहे आणि केसांच्या वाढीसाठी ते आवश्यक आहे.
  • पालक खाल्ल्याने तुमच्या केसांना फोलेट, आयर्न, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व मिळतात जे चमकदार केसांसाठी महत्वाचे आहेत.
  • केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही सॅल्मन सारख्या फॅटी माशांचे सेवन वाढवू शकता, त्याचे फायदे काही दिवसात दिसून येतील.
  • फळांबद्दल सांगायचे तर, एवोकॅडो आणि रताळ्यापासून व्हिटॅमिन ई मिळते, ज्यामुळे रुक्ष केसांपासून सुटका मिळू शकते.

(येथे देण्यात आलेली महितो गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hair care tips get rid of split ends with these home remedies try simple tips today pvp

Next Story
Recipe: लसणाचे सेवन पोटासाठी फायदेशीर, जाणून घ्या पराठ्याची रेसिपी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी