केसगळती कमी करण्यासाठी ‘ही’ एक गोष्ट मानली जाते प्रभावी, केसांसाठी आहे खूप फायदेशीर

तुमच्या शरीराप्रमाणेच तुमच्या केसांनाही योग्य पोषणाची गरज असते.

lifestyle
गिलॉय डिटॉक्सिफायर म्हणून कार्य करते. (photo credit: indian express)

तुमच्या शरीराप्रमाणेच तुमच्या केसांनाही योग्य पोषणाची गरज असते. गिलॉयमध्ये तुमच्या केसांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक पोषक घटक असतात. मेलॅनिन, केसांसाठी आवश्यक घटकांपैकी एक, ज्याच्या कमतरतेमुळे केस गळतात आणि केस पांढरे होतात.

केसांची योग्य काळजी न घेतल्यास किंवा शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळण्याची आणि तुटण्याची समस्या उद्भवू शकते. केस गळणे अनेक कारणांमुळे उद्भवते ज्यामध्ये जास्त ताण ते पर्यावरण प्रदूषण असू शकते परंतु गिलॉय तुम्हाला या समस्यांपासून वाचवू शकते.

मात्र आजच्या करोनाच्या काळात लोकं त्यांच्या काळजीबाबत जागरूक झाले आहेत. दरम्यान आरोग्यासाठी गिलॉयचे महत्त्वही लोकांना समजले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा यकृत निरोगी ठेवण्यासाठीही हे फायदेशीर आहे. याशिवाय केस निरोगी ठेवण्यासाठी गिलॉयचा वापर फायदेशीर मानला जातो. केसांसाठी गिलॉय हा रामबाण उपाय आहे ते जाणून घेऊया –

मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास सक्षम

केसांच्या फॉलिकल्सच्या नुकसानामागे फ्री रॅडिकल्स हे एक प्रमुख कारण आहे. गिलॉयमध्ये अँटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात जे त्यांच्याशी लढण्यास सक्षम असतात. याशिवाय गिलॉयमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे कोंडा आणि केस गळणे कमी करण्यास मदत करतात.

टाळू स्वच्छ करण्यास उपयुक्त

प्रदूषण आणि धूळ-मातीमुळे अनेकांना केस गळण्याची समस्या अधिक होते. या प्रकरणात, गिलॉय डिटॉक्सिफायर म्हणून कार्य करते. याचा अर्थ असा आहे की त्याच्या वापरामुळे टाळू आणि केसांमधील घाण काढून टाकणे सोपे होते.

पोषक तत्वांचा भंडार

शरीराप्रमाणेच केसांनाही निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते. गिलॉयमध्ये असे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे केस गळणे थांबवतात. गिलॉयमध्ये आर्द्रता असते ज्यामुळे केसांना आर्द्रता मिळते. यामध्ये प्रथिने देखील असतात ज्यामुळे केस मजबूत होतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hair care tips giloy is considered effective in reducing hair fall scsm

Next Story
अजूनही सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय? आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी