scorecardresearch

Hair Care Tips : आता घरच्या घरी करता येणार केसांचं Smoothening; ‘या’ वस्तूंचा वापर करून वाचावा ७ ते ८ हजार रुपये

हेअर स्मूदनिंग आणि स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट्स अतिशय महाग असतात. प्रत्येकालाच या ट्रीटमेंट करता येतीलच असे नाही.

Smoothening of hair can be done at home
यामुळे आपले केस सरळ आणि मुलायम होण्यास मदत होऊ शकते. (फोटो : Freepik)

बऱ्याच महिलांना आपल्या कुरळ्या केसांपेक्षा सरळ केस जास्त आवडतात. त्यातच आता सिनेमा आणि मालिकांमध्ये बहुसंख्य स्त्री पात्रांचे केस हे सरळ असल्यामुळे महिलांची ‘केस सरळ हवेत’ ही इच्छा अधिक प्रबळ झाली आहे. यासाठी बाजारात अनेक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. यामुळे आपले केस सरळ आणि मुलायम होण्यास मदत होऊ शकते.

मात्र या ट्रीटमेंट्स अतिशय महाग असतात. प्रत्येकालाच या ट्रीटमेंट करता येतीलच असे नाही. पण अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर केल्यास आपल्यालाही घरच्या घरी केस सरळ करता येऊ शकतील. या गोष्टी कोणत्या आहेत आणि आपण त्यांचा कशाप्रकारे वापर करू शकतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हीही जास्त वेळ बसून काम करत असाल, तर वेळीच व्हा सावध; हृदयविकारासह वाढू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

  • ऑलिव्ह ऑईल वापरून केस सरळ करता येऊ शकतात. केसांच्या मुळांना ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. यानंतर माईल्ड शॅम्पूचा वापर करून आपले केस थंड आणि स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्यास केस सरळ होऊ शकतात.
  • अंड्याचा वापरूनही केस सरळ करता येऊ शकतात. केसांना अंड लावून केस विंचारा. यानंतर सुमारे १ तासानंतर आपले केस सामान्य पाण्याने धुवा. असे केल्याने केस लांब आणि दाट दिसतील.
  • एरंडेल तेल वापरूनही केस सरळ करता येऊ शकतील. यासाठी एरंडेल तेल आणि पाणी एका स्प्रे बाटलीत मिसळा आणि हे मिश्रण केसांवर स्प्रे करा. यामुळे केस सरळ होण्यास मदत होईल.
  • कोरफड जेल वापरूनही केस सरळ करता येतील. यासाठी तुम्ही कोरफडीचे जेल केसांच्या मुळांमध्ये लावा. हे मिश्रण काही वेळ केसांमध्ये राहू द्या. यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. असे केल्याने केस कुरळे होण्याचे समस्या दूर होईल.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hair care tips smoothening of hair can be done at home now 7 to 8 thousand rupees can be saved using these items pvp

ताज्या बातम्या