सध्याच्या युगात बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषण, दूषित पाणी आणि केमिकलयुक्त पदार्थांमुळे केसांना खूप नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी आणि केसांना योग्य पोषण मिळावे म्हणून आपण अनेक प्रकारची हेअर ऑइल वापरतो. बाजारात अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येक तेल तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकत नाही. याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. असेही काही तेल आहेत ज्यांचा वापर आपल्या केसांसाठी हानिकारक ठरू शकतो. हे तेल कोणते आहे हे जाणून घेऊया.

केसांसाठी हानिकारक तेल

  • ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल केसांसाठी खूप चांगले मानले जाते, परंतु ज्यांना पिंपल्सची समस्या आहे त्यांच्यासाठी ते योग्य नाही. ते थेट केसांवर लावणे हानिकारक ठरू शकते कारण त्यामुळे केस अधिक जड होऊ शकतात. या तेलामध्ये ऑल्युरोपीन नावाचे संयुग आढळते, ज्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो. ऑलिव्ह ऑइलचा जास्त वापर केल्याने अनेक वेळा केसांची छिद्रे बंद होऊ लागतात.

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास दूर होईल ताण-तणाव; जाणून घ्या शरीराला होणारे इतर फायदे

  • मिनरल ऑइल

बरेच लोक त्यांच्या केसांमध्ये मिनरल ऑइल लावतात. हे तेल केसांसाठी हानिकारक ठरू शकते कारण त्यात पेट्रोलियम आणि पॅराफिन वॅक्सचा वापर होतो, जे नैसर्गिक नसते. याचा नियमित वापर केल्यास केस गळण्याची समस्या तर निर्माण होतेच त्याचबरोबर केसांच्या मुळांनाही खूप नुकसान होते.

  • कापूर तेल

कापूर तेल केसांच्या अनेक समस्या दूर करू शकते, परंतु ते प्रत्येकासाठी फायदेशीर ठरत नाही. कारण त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. केसांना कापूर तेलाने मसाज केल्यास डोक्याची त्वचा निर्जीव होऊ लागते आणि त्याचबरोबर बुरशीजन्य संसर्ग, पुरळ आणि पिंपल्सचा धोका वाढतो.

Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे

  • लिंबाचे तेल

अनेकजण केसांच्या तेलात लिंबाचा रस मिसळून वापरतात, तर असेही काही लोक आहेत जे थेट डोक्यावर लिंबाचा रस पिळतात, परंतु असे करणे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लिंबामुळे केस आकुंचन पावू लागतात, त्यामुळे ते पातळ आणि निर्जीव होऊ शकतात. ज्यांचे केस आधीच कोरडे आहेत त्यांनी केसांसाठी लिंबाचा रस किंवा लिंबाचे तेल वापरू नये.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)