White Hair Problem: वाढत्या प्रदूषणामुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हल्ली लोकांचे केस कमी वयात पांढरे होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत लोक पांढरे केस लपवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधतात. त्याचबरोबर काही लोक केसांचा रंगही वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का, हेअर डाईचा वापर केल्याने तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. कारण यामध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. अशा परिस्थितीत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण येथे आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्याने तुम्ही तुमचे पांढरे केस काळे करू शकता. चला जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांढरे केस काळे करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

ब्लॅक टी आणि कॉफी वापरा
पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही ब्लॅक टी आणि कॉफी वापरू शकता. यासाठी तुम्ही ३ चमचे कॉफी बीन्स घ्या, आता ते चांगले बारीक करा. आता हे कॉफी बीन्स ३ कप पाण्यात उकळून घ्या. यानंतर त्यात तीन ग्रीन टी बॅग्स टाका. यानंतर मिश्रणाला चांगली उकळी आल्यावर थोडा वेळ थंड करा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने हे मिश्रण केसांना लावा. आता ते तासभर केसांवर राहू द्या आणि थोड्या वेळाने आपले केस धुवून टाका. असे केल्याने केस पांढरे होण्याची समस्या दूर होईल.

आणखी वाचा : Skin Care Tip: तिशीनंतर सुरकुत्यापासून सुटका मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

ब्लॅक टी आणि तुळस
पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुळस आणि ब्लॅक टी चा ही वापर करू शकता. यासाठी एक कप पाण्यात ५ चमचे ब्लॅक टी टाका. आता त्यात ५ तुळशीची पाने टाका आणि चांगले उकळून घ्या. पाण्याला उकळी आल्यावर त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट केसांना लावा. असे केल्याने तुमचे केस पांढरे होणे थांबेल.

ब्लॅक टी चा थेट वापर
पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ब्लॅक टी वापरू शकता. ब्लॅक टीमध्ये भरपूर टॅनिक अॅसिड असते जे तुमचे केस काळे करण्याचे काम करते. यासाठी आधी तुम्ही २ कप पाणी घ्या. त्यात ५ ते ६ चमचे ब्लॅक टीची पाने टाका. आता हे पाणी चांगले उकळवा, त्यानंतर अर्धा तास या पाण्यात केस भिजवून ठेवा, नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. असे तुम्ही आठवड्यातून ४ वेळा करू शकता.अशा प्रकारे तुम्ही पांढरे केस काळे करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hair care tips tips to get rid of the problem of white hair white hair problem solution prp
First published on: 25-05-2022 at 19:40 IST