Stop Hair Fall Naturally: केस गळणे आणि तुटणे ही आजकाल सामान्य समस्या बनली आहे. खराब आहार, ताणतणाव, हार्मोनल बदल आणि प्रदूषण यामुळे आपले केस कमकुवत होतात. आजच्या काळात केस गळणे ही जवळपास प्रत्येक घरात ऐकू येणारी समस्या आहे. प्रदूषण, ताणतणाव, अयोग्य आहार, रासायनिक प्रॉडक्ट्स यामुळे केसांची मुळे कमजोर होतात. अनेकदा महागड्या शॅम्पू, तेलं वापरूनही काही फरक पडत नाही. केस गळायला लागले की भांग पसरट दिसू लागतो, कपाळावरचे छोटे केस निघून जातात आणि चेहऱ्याची आकर्षकता कमी होते. ही समस्या विशेषतः महिलांना जास्त जाणवते, कारण केसांमुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव येतो. तज्ज्ञ सांगतात की केस गळती थांबवण्यासाठी केवळ बाहेरून वापरणारे उपाय पुरेसे नसतात, आहारातून मिळणारे पोषण आणि घरगुती उपचारही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र योग्य पोषण आणि काही सुक्या मेव्याचे सेवन ही समस्या लक्षणीयरीत्या कमी करू शकते.

बदाम

व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमने समृद्ध असतात. हे दोन्ही घटक केसांची मुळे मजबूत करतात आणि केस तुटणे कमी करतात. दररोज ५-६ बदाम खाल्ल्याने केसांच्या आरोग्यात लक्षणीय फरक पडू शकतो.

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे केसांची वाढ आणि चमक वाढवतात. नियमित अक्रोडाचे सेवन केल्याने केस मजबूत होतात आणि तुटणे कमी होते.

काजू

काजूमध्ये मॅग्नेशियम आणि तांबे सारखे पोषक घटक असतात. ते केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे कमी करतात. दररोज काही काजू खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारते.

पिस्तामध्ये

व्हिटॅमिन ई आणि आवश्यक फॅटी अॅसिड असतात, जे केसांना पोषण देतात आणि मजबूत करतात. पिस्ता खाल्ल्याने केसांची वाढ होते आणि तुटणे कमी होते.

मनुका

मनुका लोह आणि इतर खनिजांनी समृद्ध असतात. लोहाची कमतरता केस गळतीचे एक प्रमुख कारण असू शकते. दररोज काही मनुका खाल्ल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती कमी होते.

अंजीरमध्ये

फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे निरोगी आणि मजबूत केस राखण्यास मदत करतात. अंजीरचे नियमित सेवन केल्याने केस तुटणे कमी होते आणि केसांची वाढ वाढते.

खजूर

हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्तम स्रोत आहे. ते केसांना पोषण देतात आणि केस गळणे कमी करतात. दररोज खजूर खाल्ल्याने केस मजबूत आणि दाट होण्यास मदत होते.

टीप – सुकामेवा कमी प्रमाणात खा. जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.