पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमचे केस लहान वयातच गळू शकतात. याशिवाय शरीरात आयर्न, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे लहान वयात केस गळण्याच्या तक्रारी होऊ शकतात. केस गळणे ही एक सामान्य समस्या असू शकते.

केसांची वाढ आणि गळती टाळण्यासाठी काही जीवनसत्त्वे आवश्यक असतात. ही जीवनसत्त्वे ए, बी, सी, डी, ई, कॉम्प्लेक्स, आयोडीन, मॅग्नेशियम, तांबे, लोह, फॉस्फरस, सिलिकॉन आणि पोटॅशियम आहेत. शरीरात त्यांच्या कमतरतेमुळे केसांचे खूप नुकसान होते आणि केस गळणे सुरू होते. चला जाणून घेऊया केस गळणे कसे थांबवायचे

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

या आजारांमुळे केस गळतात

तज्ञांच्या मते, थायरॉईड, केमोथेरपी, दादांसारखे टाळूचे संक्रमण, टाळूवर डाग निर्माण करणारे लायकेन प्लॅनससारखे रोग आणि काही प्रकारचे ल्युपस रोग हे वैद्यकीय स्थिती आहेत ज्यामुळे कायमचे केस गळतात.

केसगळती थांबवण्यासाठी करा घरगुती उपाय

आजही लोकांचा घरगुती उपचारांवर विश्वास आहे, तर काही लोकं त्यांच्या आजीचा बटवा खूप वापरतात. अशा परिस्थितीत केसगळती रोखण्यासाठी केसांना रोज तेलाने मसाज करा, आरोग्यासोबतच केसगळतीची समस्या रोखण्यासाठी आवळा खूप गुणकारी आहे. त्यामुळे रोज एक आवळ्याचे सेवन करावे. केसगळती नियंत्रित करण्यासाठीही मेथी सुद्धा गुणकारी आहे. यासाठी मेथीच्या पाण्याचे सेवन करू शकता. यासोबतच कोरफड आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे.

तुमचा आहार असा असावा

तुम्ही जे खातात त्याचा तुमच्या केसांवरही परिणाम होतो. संतुलित आणि पौष्टिक आहार घेऊन तुम्ही तुमचे केस दाट आणि काळे करू शकता. त्यामुळे सुंदर आणि दाट केस येण्यासाठी पालक, रताळे, गाजर, अक्रोड, अंडी, केळी, वाटाणे, ओट्स, मोड आलेली कड धान्य इत्यादींचा समावेश करा. कोरड्या, पातळ, निर्जीव आणि कमकुवत केसांसाठी मोड आलेली कडधान्य हे वरदान आहे. त्याचा आहारात समावेश करून तुम्ही तुमचे केस खूप मजबूत बनवू शकता.