गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक मोठे बदल घडतात. बदलत्या हार्मोन्समुळे त्वचा आणि केसांशी संबंधित समस्याही या काळात दिसू शकतात. यामागे तणाव, हार्मोन्समधील चढउतार आणि काही औषधांच्या वापरामुळे केस पातळ होऊन गळू लागतात. ज्यामध्ये काही महिलांचे केस गरोदरपणात इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असल्याने दाट आणि चमकदार होतात. त्याचबरोबर काही महिलांना केसांच्या अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरोदरपणात केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक स्त्रिया महागड्या शॅम्पूचा वापर करतात पण त्यामुळे काही फरक पडत नाही. चला जाणून घेऊया केस मजबूत करण्यासाठी आपण काय करू शकतो. गरोदरपणात महिलांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. विशेषत: बदलत्या ऋतूंनुसार गरोदर महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे, जेणेकरून त्यांना सर्दी, खोकला, घसा खवखवणे, केस गळणे यासारख्या समस्यांपासून वाचता येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hair problems increase during pregnancy and post pregnancy know how to keep hair healthy scsm
First published on: 29-11-2021 at 10:27 IST