turmeric tea benefits and uses: कोविड-१९ साथीच्या आजारानंतर आपण सर्वजण निरोगी जीवनासाठी रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व समजून घेतले आहे. यासाठी निरोगी आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. आजकाल लोक त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हर्बल पेयेदेखील वापरतात. पोषणतज्ज्ञ निधी गुप्ता यांनी हर्बल पेयामध्ये हळद मिसळण्याचा एक उत्तम मार्ग सांगितला आहे. याचा अर्थ असा की, हळदीमध्ये काही घटक मिसळून एक अद्भुत हर्बल पेय तयार करता येते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे हळदीचे पेय तुमच्या सोयीनुसार कधीही सेवन केले जाऊ शकते.
हळदीच्या पेयाचे फायदे:
निधी गुप्ता यांनी सोशल मीडियावर शेअर केले की, हळद ही अँटीऑक्सिडंट्सचे एक शक्तिशाली केंद्र आहे. हळद केवळ शरीरातील रोग आणि संसर्ग रोखत नाही तर ती त्वचेसाठीदेखील खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन हे संयुगदेखील असते, जे सांधेदुखी, संधिवात वेदना आणि जळजळ कमी करते.
आरोग्य प्रशिक्षक आणि हार्मोनलतज्ज्ञ शिखा गुप्ता देखील सहमत आहेत. त्या म्हणतात की, हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म भरपूर असतात, ज्यामुळे ती मधुमेह, हृदयरोग, संधिवात आणि अल्झायमर रोगांसाठी खूप फायदेशीर ठरते. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हळदीचे सेवन केल्याने नैराश्यदेखील कमी होऊ शकते.
हळदीमध्ये असलेले करक्यूमिन सांधेदुखी कमी करते.
हळदीतील करक्यूमिन आणि काळी मिरीमधील पाइपरिन हे दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहेत, जे अनेक रोगांशी लढू शकतात, म्हणून तुम्ही हळद आणि काळी मिरी पाण्यात गरम करून चहा म्हणून पिऊ शकता. पर्यायी म्हणून तुम्ही दालचिनी, आले आणि हळद एकत्र करून चहा म्हणून पिऊ शकता. हे घटक पचनास मदत करतात आणि चयापचय वाढवतात, ज्यामुळे एकूण पचन सुधारते.
