These serious reasons can be behind the peeling of the skin on the hands; Know the right treatment for it | Loksatta

हाताच्या त्वचेची सालं निघण्यामागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे; जाणून घ्या त्यावर योग्य उपचार

पावसाळ्यात त्वचेची सालं निघण्याची समस्या वाढते, त्यामुळे त्वचेचा वरचा थर सोलायला लागतो. त्याची इतर कारणे आणि उपचार जाणून घ्या.

हाताच्या त्वचेची सालं निघण्यामागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे; जाणून घ्या त्यावर योग्य उपचार
photo(freepik)

पावसाळ्यात त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. त्यातील एक म्हणजे हातातील त्वचेची सालं निघणे. यामुळे तुम्हाला जळजळ, खाज सुटणे, लालसरपणा आणि वेदना जाणवू शकतात. सोललेली त्वचा म्हणजे वरची त्वचा काढून टाकली गेली आहे आणि खवलेयुक्त त्वचा दिसू लागते. त्वचेची सालं निघण्यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्याबद्दल आम्ही पुढे जाणून घेणार आहोत आणि ते बरे करण्याचे उपचार देखील जाणून घेऊ.

हाताच्या त्वचेची सालं निघण्याची कारणे

  • सनबर्नमुळे हाताला जळजळ आणि त्वचेची सालं निघण्याची समस्या असू शकते.
  • जर क्रीम हाताला लावले नाही तर त्वचा कोरडी होऊ शकते आणि त्वचेचा वरचा थर सोलू शकतो.
  • शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा निघू शकते.
  • त्वचेतील ऍलर्जीमुळे त्वचेची सालं निघू शकतात. पावसाळ्यात ही समस्या अनेकदा उद्भवते.
  • बुरशीजन्य संसर्गामुळे त्वचेची सालं निघू शकतात.
  • त्वचेची सालं निघण्याचे कारण कमकुवत प्रतिकारशक्ती असू शकते.
  • एक्जिमा, एरिथ्रोडर्मा यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्वचेची सालं निघण्याची समस्या असू शकते.

( हे ही वाचा: मासिक पाळी येणं नेमकं कोणत्या वयात थांबत? जाणून घ्या यादरम्यान शरीरात कोणते बदल होतात)

हाताची त्वचा निघत असेल तर काय करावे?

मॉइश्चरायझरचा वापर

जर तुम्ही त्वचेची सालं निघण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही मॉइश्चरायझर वापरावे. यावेळी सुगंध नसलेले मॉइश्चरायझर वापरावे. क्रीम किंवा लोशनमध्ये जास्त केमिकल्स असल्यास त्वचा कोरडी होऊ शकते.

कोमट पाणी

जर त्वचा अधिक कोरडी आणि सोललेली असेल तर आपण कोमट पाणी वापरावे. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने कोरडी आणि खवलेयुक्त त्वचा दूर होण्यास मदत होते. या उपायाच्या मदतीने त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास देखील मदत होते.

( हे ही वाचा: Liver Cancer risk: तोंडाच्या ‘या’ समस्येकडे दुर्लक्ष केल्यास यकृताच्या कर्करोगाचा धोका ७५% वाढतो; ‘या’ उपायांमुळे टळेल जीवावरील धोका)

मधाचा वापर

मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. इन्फेक्शनमुळे त्वचा सोलण्याची समस्या असल्यास मधाचे सेवन करावे. त्वचेवर मध लावल्यानेही फायदा होतो. १ चमचे कोरफडीचे जेल घ्या आणि त्यात २ चमचे मध मिसळा आणि स्कॅब्स असलेल्या त्वचेवर लावा. हे खाज आणि जळजळ देखील दूर करेल. कोमट पाणी घालून मधही पिऊ शकता.

पाणी प्या

त्वचेवर सालं निघत असतील तर आपण पुरेसे पाणी प्यावे. दररोज २ ते ३ लिटर पाणी प्या. पाण्याशिवाय तुम्ही नारळपाणी, लिंबूपाणी, रस आणि भाजीपाल्याचा रस इत्यादींचे सेवन करू शकता. त्वचा सोलण्याची समस्या असल्यास, आपण अतिनील किरण टाळावे आणि त्वचा झाकून ठेवावी.

( हे ही वाचा: लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्येही आढळून आला कॅन्सर; शास्त्रज्ञांनी ‘या’ चाचणीद्वारे ओळखले, वेळीच जाणून घ्या)

त्वचा सालं निघण्यापासून टाळण्यासाठी काय खावे?

जर हाताच्या त्वचेची सालं निघत असतील तर आपण आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आहारात चिया बिया, फ्लेक्ससीड, नट्स, दही इत्यादींचे सेवन केले पाहिजे. जास्त मिरची-मसाले आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. याशिवाय खूप थंड किंवा गरम अन्न खाणे टाळा. अन्नाच्या चुकीच्या तापमानाचा परिणाम त्वचेवर आणि शरीरावरही होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-09-2022 at 08:37 IST
Next Story
महिलांचे विकार आणि आहार- ‘एजिंग’ म्हणजे नेमकं काय?