हंताव्हायरस संसर्गामुळे जागतिक पातळीवर आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हंताव्हायरस हा विषाणू अलीकडील श्वसनसंस्थेच्या साथीच्या रोगांसारखा पसरण्याची शक्यता असल्याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. पण वैद्यकीय तज्ज्ञ या विषाणूचे वेगळे स्वरूप स्पष्ट करत आहेत. त्यांच्या मते,”त्याचा प्रसार कोविड-१९ च्या प्रसाराच्या पद्धतीसारखा नाही.

बंगळूरु येथील एस्टर आरव्ही हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. अरविंद एसएन यांनी एचटी लाइफस्टाइलला माहिती देताना हा विषाणू प्रत्यक्षात कसा कार्य करतो हे सांगितले आहे.

हंता व्हायरस महामारीच्या भीतीचे खंडन ( Debunking hantavirus pandemic fears)

डॉ. अरविंदा यांच्या मते, लोकांमध्ये चिंतेचे मुख्य कारण म्हणजे विषाणू लोकसंख्येमध्ये कसा पसरतो याबद्दलचा गैरसमज आहे. “जगभरात हंताव्हायरस संसर्गामध्ये अलीकडे झालेल्या वाढीमुळे लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, कारण लोकांना आता असे वाटते की, याचे एका नवीन जागतिक महामारीत रूपांतर होऊ शकते. हंताव्हायरसचा प्रसार हा कोविड-१९ सारख्या अत्यंत संसर्गजन्य श्वसन रोगांपेक्षा वेगळ्या यंत्रणेद्वारे होतो.

हंताव्हायरसचा प्रसार नेमका कसा होत(How hantavirus transmission actually occurs)

डॉ. अरविंदा यांनी स्पष्ट केले की, “हा विषाणू पूर्णपणे झुनोटिक(zoonotic) आहे, म्हणजेच तो प्राण्यांपासून – विशेषतः उंदरांपासून – माणसांमध्ये पसरतो. त्यांनी सांगितले, “संक्रमित उंदरांच्या थेट संपर्कातून माणसांना या विषाणूची लागण होते, कारण त्यांच्या मूत्र, लाळ आणि विष्ठेमध्ये हा विषाणू असतो.. हा धोका अनेकदा बंद आणि दुर्लक्षित जागांमधील हवेत असतो, ज्या जागांमध्ये योग्य मोकळ्या हवा नसते, त्या जागा स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेदरम्यान हवेत पसरणारे विषाणूयुक्त कण श्वासावाटे आत घेतल्याने लोकांना संसर्ग होतो.”

उच्च जोखमीचे क्षेत्र कोणते आहेत? (What are the high-risk areas?)

त्यांनी सांगितले की यामध्ये “शेड, गोदामे, केबिन आणि न वापरलेल्या इमारती” यांचा समावेश आहे.

विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो का? (can virus leap from one person to another)

विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो का, या प्रश्नावर डॉ. अरविंदा म्हणाले, ” एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होणारा प्रसार अत्यंत दुर्मिळ आहे. सध्याच्या संशोधनानुसार, उत्तर अमेरिका आणि इतर अनेक प्रदेशांमध्ये आढळलेले हंताव्हायरसचे बहुतेक स्ट्रेन व्यक्तींमध्ये पसरू शकत नाहीत.”

हंताव्हायरसचा प्रतिबंध आणि योग्य स्वच्छता (Prevention of hantavirus and proper hygiene)

डॉ. अरविंदा यांच्या मते, ‘हवेतून पसरणाऱ्या श्वसनमार्गाच्या विषाणूंप्रमाणे मोठ्या लोकसंख्येमध्ये पसरण्याची क्षमता या विषाणूमध्ये नसल्यामुळे आरोग्यविषयक सल्ल्याचा मुख्य भर उंदीर नियंत्रण आणि विशिष्ट स्वच्छता नियमांवरच राहतो.

“संभाव्य संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लोकांनी उंदरांशी संपर्क टाळावा आणि योग्य स्वच्छता राखावी,” असा सल्ला डॉ. अरविंदा यांनी दिला. त्यांनी जनतेला “उंदरांच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरांमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि अन्न साठवण्याच्या जागांमध्ये स्वच्छता राखण्याचे” आवाहन केले.

हंताव्हायरसचा सामना करण्यासाठी सुरक्षित स्वच्छता पद्धती (Safe cleaning practices to counter hantavirus)

डॉ. अरविंदा यांनी अशा सामान्य स्वच्छता सवयींबद्दल सावध केले आहे, ज्यामुळे संसर्गाचा धोका प्रत्यक्षात वाढू शकतो. “उंदरांची विष्ठा साफ करण्यासाठी कोरड्या झाडून किंवा व्हॅक्यूम क्लिनरने साफसफाई करणे टाळावे, कारण या पद्धतींमुळे संसर्गजन्य घटक सभोवतालच्या हवेत पसरतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

त्याऐवजी, डॉ. अरविंदा यांच्या मते, खालील खबरदारी घेतली पाहिजे:

संरक्षक उपकरणे वापरा (Protective gear):

“दूषित ठिकाणी साफसफाईचे काम करताना लोकांनी हातमोजे, मास्क आणि जंतुनाशकांचा वापर करावा,” असे ते म्हणाले.

सामूहिक प्रादुर्भाव समजून घेणे (Understanding group outbreaks) :

जरी एकाच वेळी अनेक लोक आजारी पडू शकतात, तरी डॉ. अरविंदा यांनी स्पष्ट केले की, “क्रूझ जहाजे आणि सामायिक निवासस्थाने यांसारख्या सामूहिक ठिकाणी प्रादुर्भावाचे मुख्य कारण पर्यावरणीय संपर्क हे आहे, कारण लोक एकमेकांना थेट आजार पसरवत नाहीत.”

अशा परिस्थितीत, सामायिक आणि दूषित जागा हे सहसा एक समान कारण असते. “व्यवस्थितपणे देखभाल न केलेल्या केबिन, दूषित अन्न साठवणुकीच्या जागा आणि उंदरांचा सुळसुळाट असलेल्या जागांमुळे अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात,” असा निष्कर्ष डॉ. अरविंदा यांनी काढला.