Children’s Day 2025 Wishes Quotes Messages: आजचा दिवस आहे निरागसतेचा, आनंदाचा आणि निष्पाप हास्याचा; कारण आज संपूर्ण देशभर साजरा होत आहे बालदिन! १४ नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. नेहरूजींना मुलांबद्दल विशेष प्रेम होतं; ते मुलांच्या डोळ्यांतील निरागस चमक आणि त्यांच्या स्वप्नांतील रंग पाहून म्हणायचे, “आजची मुलं म्हणजे उद्याचं भारताचं भविष्य!” म्हणूनच हा दिवस फक्त एक औपचारिक सण नाही, तर बालपणाची गोडी पुन्हा आठवण्याचा आणि मुलांना आनंद, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता देण्याचा दिवस आहे. शाळांमध्ये, समाजात आणि घराघरांत आज छोट्या गोजिरवाण्या चेहऱ्यांवर आनंदाचा उत्सव रंगणार आहे. कधी चॉकलेट्स तर कधी स्पर्धा, नृत्य आणि हसरे कार्यक्रम असे प्रत्येक ठिकाणी बालपणाच्या रंगांची उधळण होणार आहे.

बालदिनाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्या छोट्या मनांतील मोठ्या स्वप्नांचा सन्मान! ही ती पिढी आहे, जी उद्याचा भारत घडवणार आहे आणि म्हणूनच आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक मुलाला प्रेम, शिक्षण आणि बालपणाचं स्वातंत्र्य मिळायला हवं. या विशेष दिवशी तुम्हीही तुमच्या स्टेटसमध्ये सुंदर बालदिनाच्या शुभेच्छा संदेश ठेवा, त्या निष्पाप हास्याला अभिवादन करा आणि आनंद वाटा; कारण प्रत्येक मोठ्या माणसाच्या मनात आजही एक लहानसं मूल जिवंत आहे, जे हसण्याची, खेळण्याची आणि स्वप्नं पाहण्याची वाट बघतंय. चला, त्या बालपणाला पुन्हा जगू या… आणि सर्वांना देऊ या मनापासून बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत हे शुभेच्छा संदेश शेअर करू शकता.

बालपणाच्या गोड आठवणींसोबत द्या खाली दिलेल्या बालदिनाच्या शुभेच्छा

आकाशाला स्पर्श करण्याची स्वप्नं,
आणि पावसात भिजण्याची मजा
बालपण म्हणजे आनंदाचा खजिना,
चला पुन्हा तीच निरागसता अनुभवूया,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपण म्हणजे निष्पाप हसू,
मोकळं आकाश आणि अमर्याद स्वप्नं.
त्या बालपणीच्या आठवणी आज पुन्हा उजळवू या…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चॉकलेटसारखं गोड हसू,
फुलांसारखं कोवळं मन,
त्या निरागसतेला सलाम करू या,
आजचा दिवस बालपणास अर्पण करू या,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कधी पावसात भिजू, कधी पतंग उडवू,
कधी रस्त्यावर धावू, कधी चिखलात खेळू!
चला पुन्हा बालपण जगूया,
आनंदात न्हाऊन निघूया,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लहान मनातली मोठी स्वप्नं
आणि छोट्या हातांनी घडवलेलं जग!
त्या निर्मळतेला आज नमन करू या,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अशाप्रकारे बालपणाचा गोडवा आणि आनंद साजरा करा; या खास दिवशी सुंदर मेसेजेस आणि शुभेच्छा पाठवून त्यांचा दिवस खास बनवा!