Dhanteras 2021, 2 November 2021 Horoscope: यंदाच्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा होतोय. हा दिवस देवांचा वैद्य धन्वंतरीला समर्पित असतो. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती या दिवशी भगवान धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करतो, त्याच्या आयुष्यात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. धनत्रयोदशीला सोन्या-चांदीचे दागिने आणि स्टीलची भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी जे काही खरेदी केले जाते त्याचे अनेक प्रकारचे फायदे होतात. जाणून घ्या यंदाच्या वर्षीचा धनत्रयोदशीचा दिवस कोणत्या चार राशींच्या आर्थिक बाबींसाठी खास असणार आहे.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत

मिथुन : या दिवशी घरातून संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरेल. धनत्रयोदशीचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. काही नवीन काम मिळू शकतं. व्यावसायिकांना अचानक पैसे मिळू शकतात.

( हे ही वाचा: Dhanteras 2021 Date, Puja Timings, History, and Importance: धनत्रयोदशीच्या पूजेची पद्धत, खरेदी, शुभ मुहूर्त आणि सर्व आवश्यक माहिती जाणून घ्या )

कर्क : आरोग्य चांगले राहील. आई लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. अडकलेले पैसे मिळण्याची आशा आहे.

( हे ही वाचा: Dhanteras 2021 Shopping Timing: धनत्रयोदशीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर राशीनुसार करा खरेदी, धन-धान्यात होईल वृद्धी )

कन्या : कार्यक्षेत्रात पैसा मिळण्याची शक्यता आहे. बॉससोबत तुमचे नाते मजबूत होईल. तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करू शकता, ज्यामध्ये भविष्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता असेल. कामामुळे तुम्हाला कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो, त्यातून पैसे मिळण्याची अपेक्षा असेल. आरोग्य उत्तम राहील. कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम पहाल.

मीन : व्यवसायाचा विस्तार होईल. वाहन खरेदी करू शकता. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.