Diwali 2021: दिवाळीत सुंदर दिसायचं? तर ‘हे’ आऊटफिट नक्की ट्राय करा

तुम्ही क्रॉप टॉपसोबत पलाझो घालू शकता. हा एक अतिशय आरामदायक पोशाख आहे आणि तुमचा लूक देखील छान दिसेल.

lifestyle
कोल्ड सोल्डर टॉपसह पलाझो किंवा स्कर्ट घालू शकता. (photo: indian express)

दिवाळी हा पाच दिवसांचा दिव्यांचा सण आहे, ज्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. हा सण कार्तिक कृष्ण पक्ष अमावस्येला येतो. अमावस्येच्या रात्री चंद्र उगवत नाही. पण सर्व जग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. या दिवशी लोकं दिवे आणि दिव्यांसह घर सजवतात तसेच नवीन आणि सर्वोत्तम कपडे(outfits) घालतात. या दिवाळीत काय परिधान करावे हे तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्हाला सर्वोत्तम आणि ट्रेंडिंग आउटफिट्सबद्दल माहिती सांगणार आहोत. चला जाणून घेऊया ट्रेंडिंग आउटफिट्सबद्दल…..

चिक-क्रॉप टॉप

या वर्षी तुम्ही दिवाळीच्या खास प्रसंगी चिक-क्रॉप टॉप घालू शकता. तुम्ही क्रॉप टॉपसोबत पलाझो घालू शकता. हा एक अतिशय आरामदायक पोशाख आहे आणि तुमचा लूक देखील छान दिसेल.

देसी ड्रेस कुर्ती

यावेळी तुम्ही देसी कुर्तीही घालू शकता. कुर्तीसोबत तुम्ही पँट किंवा पलाझोऐवजी स्कर्ट घालू शकता. याशिवाय तुम्ही या ड्रेससोबत कानातले पेअर करू शकता.

कोल्ड सोल्डर टॉप

कोल्ड सोल्डर टॉपसह पलाझो किंवा स्कर्ट घालू शकता. हे देखील दिवाळीसाठी एक उत्तम आणि ट्रेंडी पोशाख आहे. यासोबत तुम्ही ऑक्सिडाइज्ड कानातले घालू शकता.

कुर्तीसोबत सिगारेट पॅन्ट

या दिवाळीत तुम्ही असे काहीही करून पाहू शकता. कुर्तीसोबत सिगारेट पॅन्ट, हा थोडा वेगळा ड्रेस आहे आणि तुम्हीही त्यात वेगळे आणि स्टायलिश दिसाल.

शर्ट सह स्कर्ट

या वर्षी तुम्ही काहीतरी वेगळे करून पाहू शकता. शर्टसह स्कर्ट जोडणे खूप वेगळे असेल, परंतु उत्कृष्ट देखील असेल. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीमध्ये असे पोशाख घालतात. ही दिवाळी तुमच्यासाठीही करून पहा.

Diwali Rangoli Designs 2021: झटपट काढा ‘या’ सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन

अनारकली कुर्तासोबत पलाझो

अनारकली हा ड्रेस थोडा जुना झाला असला तरी लोकांना पार्टी किंवा सणांना तो घालायला आवडतो. कारण हा एक उत्तम पोशाख आहे आणि तुम्हाला पूर्णपणे भारतीय लुक देतो. तर या दिवाळीत तुमच्यासाठी अनारकली कुर्तीसोबत पलाझो नक्कीच ट्राय करा.

मॅक्सी ड्रेस

या दिवाळीत तुम्ही मॅक्सी ड्रेसही ट्राय करू शकता. हा ड्रेस खूप आरामदायक आहे आणि तुम्हाला आकर्षक देखील बनवतो. तसेच हा पोशाख ट्रेंडमध्ये आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Happy diwali 202110 stunning diwali party outfit ideas scsm

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!
ताज्या बातम्या