Happy Holi 2019 : वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा होळीचा सण त्यापैकीच एक. उद्या देशभरात होळी उत्साहात साजरी केली जाईल. अनेक ठिकाणी होलीका दहन म्हणजे होळी प्रजलवित करण्यात येते. याला शिमगा असेही संबोधले जाते. जसा हा सण आनंदाचा आहे तसाच तो साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे. साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे.

शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने शेतकरी जाळून टाकायचा. यामुळे शेतजमीनी अधिक सुपीक व्हायच्या. पारंपारिक होळीत झाडांच्या सुक्या काट्या, गोवऱ्या इत्यादी जाळलं जातात. गोवऱ्या जाळल्यानं हवा शुद्ध होते. त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने कडूनिंब-एरण्ड यांसारखी औषधी झाडांचं लाकूडही जाळलं जायचं. हे जाळण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. थंडीनंतर सुरु होणार्‍या उन्हाळ्याच्या ऋतुसंधिकाळामध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच या काळात त्रासदायक कीटकांचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?
mumbai, High Court, Body Massage Devices, Not Considered, Sex Toys, Commissioner of Customs,Cannot Be Confiscated, marathi news,
बॉडी मसाजासाठीची उपकरणे सेक्स टॉय नाहीत – उच्च न्यायालय

(आणखी वाचा : Holi 2019 : होळीला त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स )

या होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हादेखील एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा; पर्यावरणाला अनुरूप असा उत्सवाचा विधी होता. परंतु आता मात्र पारंपारिक होळीच स्वरूपच पूर्णपणे बदललं आहे. आता होळीसाठी सर्रास झाडांची कत्तल केली जाते, तसेच होळी पेटवताना त्यात प्लॅस्टिक, टायरदेखील जाळले जाते त्यामुळे हवा शुद्ध होण्याऐवजी ती अधिक दूषित होतं जाते.

(आणखी वाचा : Holi 2019 : घरच्या घरी असे तयार करा नैसर्गिक रंग ) 

होलिका दहनचा शुभ मुर्हूत – 

या वर्षी होलिका दहन २० मार्च रोजी आहे. या दिवशी सकाळी १० वाजून ४३ मिनिटांनी फाल्गून पौर्णिमा सुरूवात होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी संपेल. बुधवारी २० मार्च रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर होळी पेटवली जाईल. गुरूवार (२१ मार्च) हा दिवस धूळवड म्हणून साजरा केला जाणार आहे.बुधवारी सायंकाळी ५.०८ ते ६.२० वाजेपर्यंत होलिकादहन केल्यास हरकत नाही. परंतु, होळी प्रज्वलित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट मुहूर्त हा रात्री ८.५६ नंतर आहे.