Holi 2019 : पाण्यात मोबाईल पडल्यास काय कराल

रंगपंचमीच्या दिवशी रंगामध्ये सर्वजण रंगून जातात. या आनंदी क्षणाला कैद करण्यासाठी अनेक तरूण-तरूणी मोबाईलचा वापर करतात.

Happy Holi 2019 : होळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. रंगपंचमीच्या दिवशी रंगामध्ये सर्वजण रंगून जातात. या आनंदी क्षणाला कैद करण्यासाठी अनेक तरूण-तरूणी मोबाईलचा वापर करतात. मात्र, फोन अचानक रंगात अथवा पाण्यात पडतो आणि आपल्या आनंदात विरजन पडते. मनसोक्त रंग खेळताना किंवा पाण्यात भिजताना आपलं सगळं लक्ष आपल्या मोबाइल फोनकडं असतं. त्यामुळं रंगांची उधळण करताना टेन्शन येतं. आपला रंग बेरंग होऊ नये यासाठी काही खास टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. होळीमध्ये मोबाईलचा वापर कसा कराल..याच्या या टिप्स आहेत…

– लहान मुलं पाण्याचे फुगे, पिचकाऱ्या घेऊन खेळताना दिसतात. त्यामुळं बाहेर पडताना मोबाईलसाठी वॉटरप्रूफ कव्हर वापरा.
– मोबाइल पाण्यात पडल्यास तो ताबडतोब बाहेर काढा. आणि लगेच स्विच ऑफ करा. ओला मोबाइल पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू नका.
– मोबाइलमध्ये पाणी गेले असेल तर सर्वप्रथम सिमकार्ड, मेमरी कार्ड काढून घ्या. त्यानंतर मोबाइल कव्हर, स्क्रीन कव्हर वेगळे करा.
– मोबाइलचे भाग वेगळे काढल्यानंतर प्रत्येक भाग कोरड्या कापडानं आणि हलक्या हातानं पुसून घ्या. कोणत्याही भागावर पाण्याचा अंशही राहणार नाही, याची काळजी घ्या.

– मोबाइल ओला झाल्यानंतर तांदळाच्या हवाबंद डब्यात ठेवा. दोन दिवस मोबाइल तांदळाच्या डब्यात ठेवल्यास कोरडा होतो.

– अनेकदा भिजलेला मोबाइल काही वेळात सुरू होतो. त्यावेळी सर्वप्रथम त्यातील महत्त्वाचा बॅकअप घेऊन ठेवा. कारण भिजलेला मोबाइल कधीही डेड होण्याची शक्यता असते.

ही चूक करू नका –
– मोबाईल पाण्यात भिजल्यानंतर त्याला कडक उन्हात कधीही ठेवू नका.

– मोबाइल कधीही हेअर ड्रायरनं वाळवू नका. ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळं फोनमधील सर्किट वितळू शकतात. त्यामुळं मोबाइल कायमचा खराब होण्याची शक्यता वाढते.

– ओला मोबाइल चार्ज करण्याचा प्रयत्न करू नका. असं केल्यास शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Happy holi 2019 these tips to protect your smartphon this holi

ताज्या बातम्या