व्हॅलेंटाइन डेच्या २ दिवस आधी १२ फेब्रुवारीला हग डे साजरा केला जातो. आपल्या जोडीदाराला मिठी मारण्याची भावना यापेक्षा सुंदर काय असू शकते. ज्या भावना शब्दांतून व्यक्त करता येत नाहीत, त्या भावना तुम्ही प्रेमाने मिठी मारून व्यक्त करू शकता. या हग डेला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तसेच तुमचे आई-वडील, भाऊ, बहीण, मित्र यांनाही प्रेमळ मिठी मारा, कारण एखाद्याला मिठी मारल्याने एक सुंदर अनुभव तर मिळतोच, याशिवाय आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया मिठी मारण्याचे काय फायदे आहेत.
हृदयासाठी फायदेशीर
एका अभ्यासानुसार, मिठी मारल्याने शरीरात लव्ह हार्मोन ऑक्सीटोसिनची पातळी वाढते. यामुळे हृदय निरोगी राहते. तसेच हृदयाशी संबंधित आणि ब्लड प्रेशर आजाराचा धोका कमी होतो.




रक्तदाब कमी होतो
शास्त्रज्ञांच्या मते, मिठी मारल्याने रक्तदाबही कमी होतो. शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन सोडल्यामुळे हे घडत असते. तसेच ५९ लोकांवर केलेल्या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की जे लोक आपल्या जोडीदाराला वारंवार मिठी मारतात, त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.
Hug Day 2022 : वेगवेगळ्या प्रकारच्या मिठीचा नेमका अर्थ माहितेय का?
तणाव कमी होतो
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की एखाद्या विशिष्ट व्यक्तीला मिठी मारल्याने स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉलची पातळी कमी होते. मिठी मारल्याने तणाव तर कमी होतोच, शिवाय व्यक्तीची स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते.
मूड फ्रेश होतो
मिठी मारल्यानेही व्यक्तीचा मूड फ्रेश राहतो, असे संशोधकांचे मत आहे. वास्तविक जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा तुमचा मेंदू अधिक सेरोटोनिन हार्मोन तयार करतो, जो तुमचा मूड फ्रेश ठेवण्यास मदत करतो. मिठी मारल्याने व्यक्तीची काम करण्याची क्षमता देखील वाढते.
लवकर आजारी पडत नाही
४०० हून अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की मिठी मारल्याने व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता कमी होते. ज्यांना त्यांच्या जोडीदाराची साथ मिळते, ते कमी आजारी पडतात.