Krishna Janmashtami wishes 2026 : हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा होणाऱ्या या उत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. यंदा २०२६ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी ४ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.

जन्माष्टमीच्या निमित्ताने मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच अनेकांच्या घरी श्रीकृष्णाची पूजा करून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. या खास दिवसाचा आनंद आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि प्रियजनांसोबत शेअर करण्यासाठी तुम्ही त्यांना सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

WhatsApp, Facebook आणि Instagram वर शेअर करण्यासाठी खास श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश, स्टेटस आणि सुंदर HD Images आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या खास शुभेच्छांच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांना जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा द्या आणि त्यांच्या आनंदात भर घाला.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (krishna janmashtami 2026 Wishes in Marathi)

रुप मोठे प्रेमळ आहे,
चेहरा त्याचा निराळा आहे,
सर्वात मोठ्या समस्येला,
श्रीकृष्णाने सहज मात दिली आहे
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा! (krishna janmashtami Wishes In Marathi)

Happy Krishna Janmashtami 2025 Wishes in marathi

दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक, पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्वक शुभेच्छा! (gokulashtami 2026 Wishes, Quotes In Marathi)

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास
असा आहे श्रीकृष्ण खास
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

Shree Krishna Janmashtami Wishes 2025
श्रीकृष्ण जन्मोत्सव शुभेच्छा संदेश

जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा संदेश (Happy Janmashtami 2026 Shubhechha In Marathi)

गोळकामध्ये होता ज्याचा वास,
गोपिकांसोबत ज्याने रचला रास,
यशोदा, देवकी ज्याची मैय्या,
तोच साऱ्यांचा लाडका
श्री कृष्ण कन्हैया!

कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा २०२६

अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं

Krishna Janmashtami 2025 Wishes in Marathi
कृष्ण जन्माष्ठमी २०२६ शुभेच्छा (फोटो – Chatgpt ai)

कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं गाव
अशा कन्हैयाला
आम्हा सगळ्यांचं नमन (Janmashtami 2026 Wishes, Messages & Quotes)

Krishna Janmashtami Wishes 2025
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा २०२६

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास
असा आहे आजचा दिवस खास
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा!

Krishna Janmashtami 2025 Wishes in Marathi
जन्माष्ठमी शुभेच्छा संदेश २०२६ (फोटो – chatgpt ai)

गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥ध्रु.॥
गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥२॥
तुका म्हणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥३॥

Happy Janmashtami 2026 wishes in Marathi
कृष्ण जन्माष्टमी २०२६ शुभेच्छा (फोटो – chatgpt ai)

(लोकसत्ता डॉट.कॉमकडून वाचकांनाही श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खूप खूप शुभेच्छा (Inspiring Radha Krishna wishes for Janmashtami 2026)