Mahashivratri 2026 Wishes Quotes Messages: हिंदू धर्मात महाशिवरात्रीच्या व्रताला अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीला झाला होता, त्यानंतर ही विशेष तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री रविवार, १५ फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे.
महादेवाला भोलेनाथ, शंकर, महेश, रुद्र, नीलकंठ, गंगाधर इत्यादी अनेक नावांनीही ओळखले जाते. महादेव हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहेत. शंकर त्यांच्या सौम्य रूपासाठी आणि त्यांच्या उग्र रूपासाठी प्रसिद्ध आहेत. महाशिवरात्रीला लाखो भक्त कडक व्रत करून महादेवाची पूजा-आराधना करतात. यानिमित्ताने देशभरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याबरोबरच एकमेकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही देतात.
यानिमित्ताने तुम्हीदेखील मित्रांना, कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून खास मराठीतून शुभेच्छा देऊ शकता. यासाठी महाशिवरात्रीवर आधारित काही मराठी शुभेच्छांची यादी पाहू …
महाशिवरात्रीनिमित्त मंगलमय शुभेच्छा मेसेज

कैलासीचा राजा भोळा सदाशिव
लावंण्याची ठेव स्वामी माझा
जटे माझी गंगा, अर्ध चंद्र भाळी
कर्पूर झळाळी कांती शोभे
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

दुःख दारिद्र्याचा नाश होवो
सुख समृद्धी दारी येवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरुवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
न जगण्याचा आनंद न मरणाचे दुःख
जोपर्यंत आहे जीव तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

शिवाच्या भक्तीने, शक्तीने
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
बेलाचे पान वाहतो माझ्या महादेवाला,
करतो वंदन माझ्या दैवताला,
सदैव तुझी कृपादृष्टी मिळो,
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
त्रिशुळ डमरू हाती
संगे नाचे पार्वती
आवड तुला बेलाची
ऐ भोळ्या शंकरा!
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

भगवान शिव तुमच्या कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव करो
तुम्हाला सुख, वैभव, समृद्धी आणि शांती देवो.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी
तुज विण शंभु मज कोण तारी,
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
काळ तू, महाकाल तू,
तूच राजा, तूच प्रजा
तूच सत्य आणि तूच विश्वास
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

