Best Wishes for Makar Sankranti 2026: तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला! मकर संक्रांत हा नवीन वर्षातला पहिला सण, हा सण केवळ धार्मिकच नाही, तर नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा, सकारात्मकतेची सुरूवात करणारा आणि नव्या आशेचा संदेश देणारा सण आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांत हा महत्त्वाचा सण आहे.हा सण धार्मिक आणि पवित्रतेचा संगम आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी सूर्य देव शनि देवाच्या घरात प्रवेश करतात. या दिवशी पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो. तसंच एकमेकांना तिळगुळ, लाडू देऊन शुभेच्छा दिल्या जातात. तर मग या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्हीसुद्धा तुमच्या प्रियजनांना हटके शुभेच्छा द्या…

मकर संक्रांतीच्या मराठीत शुभेच्छा…

१. तिळगुळ घ्या गोड गोड बोला
नव्या आशा, नवं यश तुमच्या आयुष्यात येवो
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

मकर संक्रांत २०२६ शुभेच्छा

२. आयुष्यातला प्रत्येक क्षण खास होवो
तिळगुळासारखा गोड सहवास आयुष्यभर राहो
मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा!

३. तीळ आणि गूळ एकत्र येऊन जसा गोडवा निर्माण होतो,
तसाच हा सण आपल्या नात्यात गोडवा आणो
नव्या वर्षाच्या पहिल्या सणात
तुम्हाला आनंद, आरोग्य आणि समृद्धी लाभो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

४. गोड नाती, गोड सण,
तुम्हाला मिळो खूप समृद्धी आणि धन
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

५. तिळात मिसळला गूळ,
त्याचा केला लाडू,
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

६. गोड गुळाला भेटला तीळ,
उडाले पतंग रमले जीव
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मकर संक्रांतीच्या पती-पत्नीसाठी शुभेच्छा

तिळासारखे स्नेहबंध आणि गुळासारखा गोडवा
आपल्या संसारात असाच वाढू दे
मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा!

आयुष्याच्या प्रवासात तुझी साथ
म्हणजे तिळगुळाचा गोडवा
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

तिळगुळाचा गोडवा आणि आपल्या प्रेमाची उब
अशी राहो जन्मोजन्मी खास
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!