आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मदर्स डे. मे महिन्यतील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. यंदा १० मे रोजी भारतासह जगभरात मदर्स डे साजरा केला जाणार आहे.

मदर्स डे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील आईला छानसे गिफ्ट देऊन तुम्ही त्यांच्यावरील प्रेमाची पोचपावती देऊ शकता. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते- आई, सासू, आजी किंवा इतर कोणी… यंदा लॉकडाउन असल्यामुळे सर्वजण घरातच आहे. त्यामुळे आईवरील प्रेम व्यक्त करताना काय गिफ्ट देऊ असा प्रश्न पडलाय? मग या काही आयडियाज तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील…….

rahul gandhi in tamil nadu
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन एकत्र; तामिळनाडूमध्ये भाजपाला कसे रोखणार?
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा
Agra Woman Plans Husband Murder
पतीला ठार करण्यासाठी पत्नीने दिली ऑनलाईन ‘सुपारी’, What’s App वर ठेवलं ‘हे’ स्टेटस

फोटोंचा कोलाज किंवा छोटासा व्हिडिओ –
आईसोबतचे तुमचे काही हटके फोटोजचा एक छानसा व्हिडिओ तयार करा. आज मोबाइल अॅपच्या साह्याने व्हिडिओ तयार करणे सोप्पं झालं आहे. आईसोबतच्या काही जुन्या आठवणींना या फोटो आणि व्हिडिओच्या मदतीने मदत होईल. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला आईवरील आधारातील इमोशन गाणं लावा.

फुलांचा गुच्छ
अनेकदा काय गिफ्ट द्यावा, हा प्रश्न पडतो. अशावेळी फुलं उत्तम पर्याय ठरतात. तुम्ही रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ गिफ्ट करु शकता किंवा रेड रोजेस किंवा आईला आवडणारी खासं फुलं गिफ्ट करुन तुम्ही तिच्या चेहऱ्यावर स्मित फुलवू शकता. सकाळी आई उठण्यापूर्वी तिच्या उशाशी फुलांचा गुच्छ ठेवून तुम्ही तिला सरप्राईज देऊ शकता.

आईच्या आवडीचे खाद्यपदार्थ तयार करा –
इंटरनेटच्या साह्याने किंवा कोणाच्या मदतीने आईच्या आवडीचे खाद्यपदार्थ तयार करून छोटेसं सरप्राइज द्या. एक दिवस स्वयंपाकघरापासून आईला लांब ठेवा. ही देखील तिच्यासाठी उत्तम ट्रीट ठरेल. तुम्हालाही तिच्यासोबत छानसा वेळ घालवता येईल. मनमोकळ्या गप्पा होतील आणि आईला देखील खूप बरं वाटेल. तसंच स्वयंपाक करण्याला सुट्टी मिळेल, ते वेगळंच.

केक तयार करा – घरच्या घरी आईच्या आवडीचा केक तयार करा आणि आईला मस्तपैकी सरप्राइज द्या. कुटुंबांसमवेत केक कापून यंदाचा मदर्स डे उत्साहात साजरा करा.

स्वत: छानसा मेसेज लिहा –
तुम्ही जे काही आहात, त्यात तुमच्या आईचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तिला आपण जितके देऊ तितके थोडेच. पण मदर्स डे निमित्त एखादा खास मनापासून लिहिलेला संदेश तिचे मन हेलावून टाकेल. हा संदेश आईला धन्यता देईल

ई-बुक रिडर
आईला जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही तिला एखादे पुस्तक गिफ्ट करु शकता. पण ई-बुकची आयडिया जरा हटके आहे. यंदा मदर्स डे निमित्त थोडा वेगळा विचार करुन आईला काहीतरी हटके गिफ्ट द्या. आईवर प्रेमाचा वर्षाव करा आणि तिला स्पेशल ट्रीटमेंट द्या.