नववर्षाचे स्वागत करा नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने | Loksatta

नववर्षाचे स्वागत करा नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने

आपल्या प्रियजनांना आप्तेष्टांना शुभेच्छा देऊन त्यांचे हिंतचिंतन करुन नव्या वर्षाची सुरुवात करा.

नववर्षाचे स्वागत करा नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने

नवीन वर्षाच्या स्वागताला आपण सारे सज्ज आहोत. या नव्या वर्षात काहीतरी नवीन करण्याचा, काही चांगले करण्याचा तुम्ही संकल्प केला असेल. आपल्या कुटुंबियांसमवेत नवीन वर्षाची नवी पहाट आणि सरत्या वर्षाची संध्याकाळ घालवण्याचे नियोजन तुम्ही केले असेल. या वर्षात अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील. त्या या वर्षात पूर्ण करता येतील असा विश्वास तुमच्या मनात असेल. नवे वर्ष नवी स्वप्ने आणि नवी आशा घेऊन येईल तेव्हा नववर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही सज्ज आहात का?

आपल्या प्रियजनांना आप्तेष्टांना शुभेच्छा देऊन त्यांचे हिंतचिंतन करुन नव्या वर्षाची सुरुवात करा. येथे काही शुभेच्छांचा संग्रह देण्यात येत आहे.

१. सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
२. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्ने, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
३. गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
४.पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवीन संकल्प नवीन वर्ष.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
५. एक दिवस मंतरलेला, नव्या वाऱ्याने भरलेला; जगून घ्यावे सारे सारे, आकांक्षांचे नवे वारे….नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
६. चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया
७. पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने, फूलांचेही व्हावे गाणे असे जावो नवे वर्ष आनंदाने
८. पाहता दिवस उडून जातील, तुझ्या कर्तृत्वाने दिशा झाकोळून जातील, आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील…. नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!
९. नवीन वर्षाच्या सुरुवातीला केलेले सर्व संकल्प, निदान या वर्षी तरी पूर्ण होवोत या खऱ्याखुऱ्या शुभेच्छा..
१०. नव्या या वर्षी आकाशी रंग उधळले नवे, प्रत्येक क्षण साठव मनात होऊ दे त्यांचे थवे
११. येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या दिनी

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2016 at 10:28 IST
Next Story
फॅशनबाजार : जुन्यातील नवा ‘ट्रेंड’