Happy New Year 2024 Wishes : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता फक्त काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह अन् आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यासोबतच नाताळच्या निमित्ताने वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर हा दिवस जगभरात ख्रिसमस डे म्हणून साजरा केला जातो आणि या विशेष सणासोबतच लोक नवीन वर्षाची तयारीही सुरू करतात. त्यामुळे ख्रिसमसच्या दिवसापासूनच लोक सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची तयारी सुरू करतात. या वेळीही तुम्ही नववर्षाच्या निमित्ताने जवळच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना ऑनलाइन मेसेज पाठवून आनंद साजरा करा.

यंदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे नवे मेसेज शोधत असाल, तर तुमच्यासाठी खास शुभेच्छांचे मेसेज, स्टेटस घेऊन आलो आहोत. विविध सोशल प्लॅटफॉर्मवरून हे मेसेज पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी ख्रिसमस आणि नवीन वर्ष अधिक खास बनवू शकता. (Happy New Year 2024)

Happy Dasara 2024 Wishes in Marathi| Happy Vijayadashami 2024 wishes in marathi
Dasara 2024 Wishes : दसऱ्यानिमित्त नातेवाईक प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा अन् कार्ड्स; पाहा लिस्ट
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…

हेही वाचा : Wedding Muhurat 2024 : स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम्…! २०२४ वर्षातील लग्नाचे सर्व शुभ मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | New Year 2024 Wishes In Marathi

सरतं वर्ष जातंय आपल्यापासून दूर
नव्या वर्षात संपून जाऊ देत शंका- कुशंका, राग-रुसवे
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांच्या हृदयात असू दे प्रेमाची भावना
नव्या वर्षात पुरी होऊ दे अधुरी ही कहाणी
हीच प्रार्थना करते होऊन नतमस्तक
गरिबांना मिळू दे अन्न, वस्त्र आणि निवारा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपू या
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! नववर्षाभिनंदन!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्ष दिवे…
समृद्धीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे…
आपणांस व आपल्या परिवारास
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

भोवर्‍यातून बाहेर पडून किनारा मिळाला,
जगण्याला आज एक नवा अर्थ मिळाला,
चढ-उतार्‍यांनी भरलेले होते हे वर्ष,
या नव्या वर्षी परत एकदा तुझी साथ मिळाली
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

हे आपल नातं असंच राहू दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहू दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2023 या वर्षाचा
2024 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणास सुखाचे,
समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो… हीच ईश्वरचरणी प्रार्थना! नववर्षाभिनंदन!

हे साल तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी
आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2023 चा प्रवास,
अशीच राहो 2024 मध्येही आपली साथ.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात
या वर्षात उजळून जाऊ दे भाग्याची ही रेषा
परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास
तुमच्या उपस्थितीने लखलखू दे हे जीवन आज
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाकळी पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं,
नव्या आशा, नवी उमेद व नावीन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू.
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांक्षा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप मेसेज | Happy New Year 2024 Messages In Marathi

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा-अपेक्षा घेऊन आले 2024 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

नवीन वर्ष आपणास सुख-समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना!

31 तारखेला फक्त मजा करा अन् नवीन वर्षात
भरपूर काम करा…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

गतवर्षीच्या
फुलाच्या पाकळ्या वेचून घे
भिजलेली आसवे झेलून घे
सुख-दुःखं झोळीत साठवून घे
आता उधळ सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

घेऊनी नवी उमेद ,नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभ दिनी!

2024….
नवीन वर्ष आपणा सर्वांस
सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे,
सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो!

नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश,
नशिबाची दारं उघडावीत,
देव राहो तुमच्यावर प्रसन्न,
हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची. नववर्षाभिनंदन!

दुःखं सारी विसरून जाऊ ..
सुखं देवाच्या चरणी वाहू …
स्वप्नं उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेनं नव्यानं पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरुवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस | Happy New Year Status In Marathi

संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय, कोणी १५ दिवस, कोणी ७ दिवस, कोणी दोन दिवस, कोणी एक दिवस मग तुम्हीही घ्या… नववर्षाच्या शुभेच्छा! Happy New Year 2024!

नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल…
त्या घाई-गडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2024 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2024!

नवीन वर्ष येणार म्हणून
जास्त उड्या मारू नका
फक्त कॅलेंडर बदलणार आहे
बायको तीच राहणार आहे.

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेवून वाईट वजा करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याच्या या वळणावर
तुमच्यासारखे मित्र मला मिळाले यापेक्षा
जास्त मला काही नको आहे येणाऱ्या या वर्षात
तुम्हाला सुख-समृद्धी, आरोग्य लाभो
हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत सुखाचे जावो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
तुमचाच मित्र…

मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

लोक नवीन वर्षात देवाकडे खूप काही मागतील,
पण मी देवाकडे फक्त तुझी साथ मागेल
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलवूया,
नववर्षाभिनंदन!

मागील वर्षी मी केलेली सर्वांत चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा!

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या… नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

माणसं भेटत गेली,
मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व!
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खूप सारे धन्यवाद!

पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!

१ जानेवारी म्हणजे 365 पानांच्या पुस्तकाचं पहिलं कोरं पान आहे. मग छान नवीन कथा लिहा.

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा !

एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी आपण फक्त करणंच नाही तर त्याचं स्वप्नंही पाहिलं पाहिजे. नव्या वर्षात नव्या संधी मिळवा. हॅपी न्यू ईयर!

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
सन 2024 साठी हार्दिक शुभेच्छा…!

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी, हाती
येतील सुंदर तारे! नववर्षाच्या
सुरुवातीला मनासारखे घडेल सारे !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!..

दु:खं सारी विसरून जा …
सुखं देवाच्या या चरणी वाहू …
स्वप्नं उरलेली .. नव्या या वर्षी
नव्या नजरेनं, नव्यानं पाहू ..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

हॅपी न्यू इयरसाठी खास कोट्स | Happy New Year Quotes In Marathi

माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाहता दिवस उडून जातील तुझ्या
कर्तृत्वाने दिशा झळकून जातील,
आशा मागील दिवसांची करू नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज वर्षाचे शेवटचे काही तास राहिलेत…..
खूप काही गमावलं, पण त्यापेक्षा अजून कमावलं
अगदी हृदयाजवळची माणसं दूर झाली,
पण तितकीच जवळ आली,
खूप काही सोसलं,
खूप काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन कसं जगायचं हे शिकलं……
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल……
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो…….
चुकून जर मन दुखावलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा……
अन् येणारं नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभ­राटीचं राहो!
|| नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||

नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणाऱ्या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्याकडून भरभरून शुभेच्छा!

माझ्यासाठी तर 2023 वर्ष खूपच छान होतं. मला विश्वास आहे की, तुमचंही चांगलंच गेलं असेल. असाच सुरू करूया 2024 चा नवा प्रवास. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!

तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर. सर्व लोकांचे व्हा तुम्ही डियर, तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लीयर आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू इयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नको चंद्र तारे
फुलांचे पसारे..
आणि नवीन वर्षात
जिथे मी बसावे
तिथे 5G नेटवर्क असावे!

Story img Loader