ओणम हा केरळमधील अत्यंत प्रसिद्ध सण आहे. ओणमचा हा सण एकूण १० दिवसांचा असतो. फक्त केरळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लोक वर्षभर या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा हा उत्सव १२ ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि आज म्हणजेच २३ ऑगस्टला याचा शेवटचा दिवस आहे. उत्सव केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवात २१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्षात थिरुवोनमने सुरुवात होईल. ओणमदरम्यान घरं फुलं आणि रांगोळ्यांनी सजवली जातात. विशेष म्हणजे या सणाला प्रत्येक केरळी घरात विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. दिनदर्शिकेनुसार ओणम हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला साजरा केला जातो. ओणम हा सण अमर राजा बळीसाठी साजरा केला जातो. तर, शेतकरी हा सण चांगल्या कापणीसाठी आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी साजरा करतात.

ओणम का साजरा करतात?

असं म्हटलं जातं की, राजा बळीचे स्वागत करण्यासाठी ओणम सण साजरा केला जातो. असं सांगितलं जातं कि, केरळच्या राजा बळीच्या राज्यात प्रजा खूप सुखी आणि समृद्ध होती. याच दरम्यान, भगवान विष्णूने वामन अवतार घेतला आणि त्याच्या संपूर्ण राज्याचा उद्धार केला. असं मानलं जातं की बळी राजा वर्षातून एकदा आपलं राज्य आणि प्रजेला पाहण्यासाठी जरूर येतो. म्हणूनच, त्यांच्या आगमनाच्या आनंदात ओणम साजरा केला जातो. हा सण शेतकऱ्यांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
nashik police conduct combing operation across the city due to festivals celebrations
नाशिक : सण, उत्सवांमुळे अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

पौराणिक कथा

राक्षस असूनही राजा महाबळी हा अत्यंत उदार आणि दयाळू म्हणून ओळखला जात होता. त्याचं राज्य हा केरळमधील सुवर्णकाळ मानला जातो. म्हणूनच त्याचं आगमन इतक्या मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. वैष्णव पौराणिक कथांनुसार असं म्हटलं जातं कि, असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. चारित्र्यवान, विनयशील, दानशूर, प्रजाहितदक्ष राजा म्हणून त्याची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, महाबली देवांना पराभूत करून आणि तीन जगांवर कब्जा करून सत्तेवर आला. देव यावर नाखूष होते आणि त्यांनी राक्षस राजा महाबळीविरुद्धच्या युद्धात भगवान विष्णूची मदत मागितली. विष्णूदेव मदत करण्यास तयार झाले पण महाबली हा त्याचा कट्टर भक्त असल्याने त्याला युद्धात भाग घ्यायचा नव्हता. त्यावेळी बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णू वामनावतार धारण करून बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले.

वामनाने बळीराजाकडे तीन पावले भूमी मागितली. बळीराजा तयार झाला आणि दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारातल्या विष्णूंनी प्रचंड रूप धारण करतं २ पावलांत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक राहिली नाही. मात्र, वचनपूर्तीसाठी बळीराजाने आपलं मस्तक पुढे केलं. यावेळी बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचं राज्य बहाल केलं.

उत्सवाची मुख्य आकर्षणे

ओणम हा सण केरळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. केरळमध्ये या दिवशी प्रसिद्ध सर्प नौका शर्यतीचंही आयोजन केलं जातं. यासह, या दिवशी कथकली नृत्यासह या उत्सवाचा आनंद घेतला जातो. दुसरीकडे, घरांमध्ये केलेली सजावट देखील उत्सवाच्या आकर्षणाचे केंद्र असते. घरगुती पारंपरिक पदार्थ, मोठमोठया सुंदर आकर्षक रांगोळ्या आणि घराघरात पटणारे दिवे हे सणाचे मुख्य आकर्षण आहेत. तरओणमच्या पहिल्या दिवशी हत्तींची सजावट करून त्यांची रॅली काढण्यात येते.

ओणम थाळी

ओणमच्या सणाला प्रत्येक केरळी घरात बनवले जाणारे अत्यंत चविष्ट असे विविध पारंपरिक पदार्थ आणि विशेषतः ओणमची थाळी हे या सणाचं मुख्य आकर्षण आहे. पारंपारिकपणे या उत्सवात २६ किंवा अधिक शाकाहारी पदार्थ बनवले जातात. हे संपूर्ण जेवण केळीच्या पानांवरच वाढलं जातं. ह्यात पचहडी (नारळ, दही, अननस मिरची आणि मसाल्यांपासून बनवला जाणारा पदार्थ), एरीसेरी (मोहरीच्या तेलात मिरची आणि कढीपत्त्याच्या फोडणीतील भोपळा, लसूण, हिरवी मिरची आणि किसलेल्या नारळाचं मसालेदार मिश्रण), पुलीसेरी (पांढरा भोपळा, काकडी आणि ताकासह बनवलेली एक लोकप्रिय साइड डिश), थेंगा चोरू (मसाले, मिरची आणि लिंबूसह उडदाची डाळ आणि काजू असलेला तिखट चवीचा पदार्थ), भातासोबत सर्व्ह केला जाणारा अवियल (बटाटे, गाजर, कच्ची केळी, शेंगा, कैरीच्या तुकड्यांपासून बनवलेला पदार्थ) आणि पायसम या स्वादिष्ट खिरीशिवाय ओणमचा हा सण पूर्णच होऊ शकत नाही.

ओणमचा महत्त्वाचा दिवस

मल्याळम दिनदर्शिकेचा पहिला महिना चिंगमच्या सुरुवातीला ओणम साजरा केला जातो. १० दिवसांच्या या उत्सवात पहिला आणि शेवटचा म्हणजे दहावा दिवस खूप महत्त्वाचा आहे.