कालचा रोझ डे झाल्यावर आजचा दिवस आहे प्रपोज् करण्याचा. आपल्या प्रिय वाटणाऱ्या व्यक्तीला गुलाबाचं फूल देत आपल्या प्रेमाची ‘पहिली हिंट’ दिल्यावर आजचा दिवस आहे त्या ल्क्ल अाणखी एक सरप्राईझ् द्यायचा. आपल्याला ती व्यक्ती प्रिय आहे हे सांगायचा हा दिवस म्हणजे प्रपोझ डे. आजचा दिवससुध्दा महत्त्वाचा आहे. आपल्या भावना किती खऱ्या आहेत हे त्या व्यक्तीच्या मनात ठसवून द्यायचा हाच दिवस. तर मग आम्ही तुम्हाला देतोय प्रपोज करण्यासाठीची १० सजेशन्स

१. मूव्ही थिएटर

आपल्या आवडत्या व्यक्तीला एखाद्या छान लाईटहार्टेड सिनेमाला घेऊन जा. दोघांचाही मूड छान प्रसन्न असताना, सिनेमा पाहताना इंटरव्हल झाला की करा व्यक्त आपल्या भावना बिनधास्त. इंटरव्हलनंतर पुन्हा होतो अंधार!

२. पार्टी

यासाठी थोडी दोस्तांची मदत लागेल. कोणाच्या घरी एखादी धमाल पार्टी आयोदित करायची. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला अनपेक्षितपणे मनातलं सांगून टाकायचं.

३. तुमच्या पहिल्या भेटीचं ठिकाण

आपल्या आवडत्या व्यक्तीशी पहिल्यांदा भेट झाल्याचं ठिकाण आपल्या नेहमीच लक्षात राहतं. त्या ठिकाणी परत जाऊन त्या व्यक्तीला आपल्या भावना सांगितल्या तर यश मिळण्याचे चान्सेस जास्त

४. बोट

हा एक सध्याचा नव्याने फेमस होणारा प्रकार आहे. बोटिंग करताना किंवा खर्च करायची तयारी असेल तर समुद्रातल्या याॅटवर करा प्रपोझ.समुद्राच्या साक्षीने मस्त माहौल असताना समोरच्या व्यक्तीने हो म्हटलंच पाहिजे

५. समुद्रकिनारा

हे तर सगळ्यात क्लासिक ठिकाणा आहे. समुद्राची गाज एेकत आपल्या प्रियकर/ प्रेयसीच्या साथीने बसून राहण्यातली मजा काही वेगळी सांगायला नको.

६.रेस्टाॅरंट

एखाद्या हाॅटेलमध्ये रोमॅंटिक माहौल बनवून मनातल्या भावना व्यक्त करणं हा आॅप्शन तर आहेच. आपल्या खिशाला परवडेल असे अनेक पर्याय त्यातून निवडता येतात.

७. अॅडव्हेंचर स्पोर्टस्

हासुध्दा एक नवा आॅप्शन आहे. जरासा आॅफ बीट असणारा हा मार्गही ट्राय करायला हरकत नाही.

८. पेट प्रपोझल

आपण हिंदी सिनेमांमध्ये हा प्रकार बऱ्याचदा पाहिला असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीला जर प्राण्यांची आवड असेल तर एखाद्या क्यूट मांजरीच्या किंवा कुत्र्याच्या पिल्लाच्या गळ्यात मेसेज अडकवूनसुध्दा आपण आपलं म्हणणं त्याला/तिला सांगू शकतो.

९. रेडिओ

व्हॅलेंटाईन डेच्या काळात अनेक एफएम चॅनल्सवर आरजेसुध्दा प्रेमवीरांची आणि वीरांगनांची मदत करत असतात. एखाद्या गाण्याची फर्माईश करत ते गाणं आपल्या प्रिय व्यक्तीला डेडिकेट करण्याचाही आॅप्शन तुमच्या कडे आहे. सोबत काही विशेष मेसेज द्यायचा असेल तर तोही आपण सांगू शकतो. आरजे त्यांच्या छान स्टाईलमध्ये तुमचा हा मेसेज समोरच्या व्यक्तीला सांगतील

१०. टीव्ही

टीव्हीवरच्या कार्यक्रमांमधूनही आपल्या ‘सिग्निफिकंट अदर’कडे प्यार का इजहार करण्याची सोय असते. तसंच म्युझिक चॅनल्सवरसुध्दा एखादं गाणं डेडिकेट करत आपण आपला संदेश पोचवू शकतो.

तर मग दोस्तांनो, रोझ डे काल सेलिब्रेट केला असेल तर तुमच्या प्रेमाची पुन्हा ग्वाही द्यायचा हा एक दिवस आहे. आणि काही कारणाने रोझ डे साजरा केला नसेल तर करा तुमच्या ‘प्रेमसफरीची’ आजपासून दणक्यात सुरूवात!