Happy Rose Day 2026 Wishes In Marathi : फेब्रुवारी महिना प्रेमासाठी ओळखला जातो. या महिन्यात व्हॅलेंटाईन डे येतो. फक्त व्हॅलेटाईन डे नव्हे तर आखा आठवडा प्रेमाचा उत्सव असल्यासारखा साजरा करतात. व्हॅलेटाईन वीक प्रेमाच्या विविध भावनांना व्यक्त करण्याचा असतो. या व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते ती रोज डे’पासून.

यंदा शनिवारी, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘रोज डे’ साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रेमीयुगल म्हणजे कपल एकमेकांना गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. गुलाब हे केवळ फूल नसून, प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञता आणि नात्यातील सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं.

आजच्या डिजिटल काळात भावना व्यक्त करण्यासाठी शब्दही तितकेच महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच यंदा ‘रोज डे’निमित्त तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून तुमच्या प्रिय व्यक्तीला मराठीतून सुंदर शुभेच्छा, मेसेजेस आणि कोट्स पाठवू शकता.

‘रोज डे’च्या खास मराठीत शुभेच्छा (Happy Rose Day 2026 Wishes in Marathi)

१) तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गुलाब आहेस…
लोक म्हणतात गुलाबाला काटे असतात,
पण त्यांना काय कळणार प्रिये,
तुझा सहवास माझ्यासाठी केवळ सुगंधच आहे.
हॅप्पी रोज डे!

२)एक रोज त्यांच्यासाठी,
जे भेटत नाहीत रोज
पण आठवतात मात्र दररोज…
हॅप्पी रोज डे!

३) तू गुलाबासारखी नाजूक भावना आहेस,
तू सुगंधासारखी दरवळणारी आठवण आहेस,
गुलाबाच्या दिवशी तुला हा गुलाब देतो,
कारण तू माझ्या हृदयातलं सर्वकाही आहेस.
रोज डेच्या शुभेच्छा!

४) प्रेमाच्या या गुलाबी दिवशी
तुला मनापासून शुभेच्छा…
हॅप्पी रोज डे!

५) जेव्हा जेव्हा गुलाबाचं फुल पाहतो,
तेव्हा डोळ्यांसमोर तुझाच चेहरा येतो.
हॅप्पी रोज डे डिअर!

६)लाल रंग प्रेमाचा,
पिवळा मैत्रीचा,
पांढरा शांतीचा
आणि गुलाबी कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज तुला सर्व रंगांची फुलं देतो.
हॅप्पी रोज डे!

७)मैत्री आणि प्रेमात
एक छोटंसं अंतर असतं,
मैत्री गुलाबाचं फूल असतं,
आणि प्रेम त्या गुलाबाचा सुगंध…
हॅप्पी रोज डे!

Happy Rose Day 2026 Wishes in Marathi
‘रोज डे’च्या खास मराठीत शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

८) एकमेकांवर मनापासून प्रेम करणाऱ्यांना रोज डेच्या शुभेच्छा,
हॅप्पी रोज डे!

९) गुलाबाच्या फुलाला गुलाब कसा देऊ?
तूच आहेस माझा श्वास,
तुझ्याशिवाय मी कसा जगू?
हॅप्पी रोज डे!

१०)रोज डे निमित्त देतो तुला हे गुलाबाचं फूल,
तुला पाहताच लागली तुझ्या प्रेमात झालो मी Fool
हॅपी रोज डे!

११) गुलाब देताना थरथरला माझा हात,
माझ्या प्रेमाचा दरवळणारा सुंगध होता त्यात
रोज डेच्या शुभेच्छा

१२) काटे असूनही गुलाब जसा कायम सुंदर वाटतो,
आयुष्यात कितीही संकट आली तर तुझ्यामुळेच जगण्यात अर्थ वाटतो
रोज डेच्या शुभेच्छा

१३) हातात गुलाब घेतला तरी तुझीच आठवण येते
सुगंध त्याचा असतो पण तूच दरवळत असते.
रोज डेच्या शुभेच्छा

Happy Rose Day 2026 Wishes in Marathi
‘रोज डे’च्या खास मराठीत शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

१४) गुलाबाला काटे असतात, हे सगळेच सांगतात,
पण तुझ्या प्रेमात काटेही फुलांसारखे वाटतात.
रोज डेच्या शुभेच्छा

Happy Rose Day 2026 Wishes in Marathi
‘रोज डे’च्या खास मराठीत शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

१५)गुलाबाच्या रंगासारखं नातं आपलं,
कधी गडद, कधी हलकं…
दरवळणारा सुंगधात दडलंय प्रेम आपलं.
रोज डेच्या शुभेच्छा

१६) आज रोज डे, पण माझ्यासाठी रोजच सण,
कारण तुझ्या प्रेमातच उमलतं माझं मन.
रोज डेच्या शुभेच्छा