Vat Savitri Purnima 2025 Wishes In Marathi : हिंदू धर्मात महिलांसाठीचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. देशात विविध राज्यांत वेगवेगळ्या तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. यंदा १० जून २०२५ रोजी वटपौर्णिमा (Vat Purnima 2025 Marathi) साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होईल (Vat Purnima 2025 Muhurat Time) तो ११ जून रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी समाप्त होणार आहे. यानिमित्ताने विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जली व्रत ठेवतात.

याच वटपौर्णिमा सणानिमित्त तुम्ही पतीसह मैत्रिणींना WhatsApp, Instagram आणि Facebook वरून खास शुभेच्छा पाठवू शकता. तसेच मराठी ग्रीटिंग्ज आणि शुभेच्छा पत्र फ्रीमध्ये डाऊनलोड करून शेअर करू शकता. अशाच काही खास शुभेच्छा तुमच्यासाठी….

वटपौर्णिमा मराठी शुभेच्छा (Vat Savitri Purnima 2025 Shubhecha Wishes In Marathi)

१) तुम्हाला आणि तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभो, तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

२) मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम
सर्वकाही सुख लाभू द्या!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Vat Purnima 2025 wishes in marathi
वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा २०२५

३) सात जन्माची साथ
हाती तुझा हात
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Vat Purnima 2025 wishes in marathi
वट पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा

४) सण हा सौभाग्याचा
बंध हा अतूट नात्याचा
सुखाचा आणि भाग्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

Vat Purnima 2025 wishes in marathi
वट पौर्णिमा शुभेच्छा २०२५

वटपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा स्टेटस (Vat Purnima Status In Marathi)

५) एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

६) विचार आधुनिक आपले जरी,
श्रद्धा देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे
करूया वटपौर्णिमा साजरी

vat purnima shubhechha in marathi
वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

७) दोन क्षणाचे असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वटपौर्णिमेच्या खास शुभेच्छा (Best Vat Purnima Quotes In Marathi)

८) लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो पती-पत्नीची दृढ साथ
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

९) कुंकवाचा साज असाच कायम राहो
माझ्या धन्याला दीर्घायुष्य लाभो,
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

vat purnima shubhechha in marathi
वट पोर्णिमा शुभेच्छा २०२५

१०) मंगळसूत्र करून देते दिलेल्या वचनांची आठवण
सात जन्मात तुला साथ देऊन मी पाळेन पवित्र वचन
वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि मन:पूर्वक शुभेच्छा!

वटपौर्णिमेनिमित्त नवऱ्यासाठी शुभेच्छा कोट्स (Vat Purnima Quotes For Husband In Marathi)

१) सत्यवानाचे वाचवून प्राण,
वाढविली सावत्रिने सर्वांची शान,
वटसावित्रीच्या शुभेच्छा!

२) वटपौर्णिमेच्या मंगलमयी, आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा!

३) सुख – दुःखात कायम सोबत राहू,
एकच नाहीतर सात जन्मात एकमेकांचे होऊ,
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा! (vat purnima marathi status)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४) या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू,
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू…
वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!