scorecardresearch

International Women Day 2022: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुपर वुमनला पाठवा ‘या’ शुभेच्छा

तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुपर महिलांना काही प्रेमळ संदेश पाठवू शकता आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देखील देऊ शकता.

तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुपर महिलांना काही प्रेमळ संदेश पाठवू शकता. (photo credit: file photo)

८ मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला महिलांच्या योगदानाची, तपश्चर्याची आणि त्यागाची आठवण करून देतोच पण महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन एका खास थीमवर साजरा केला जातो. अशा परिस्थितीत, हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी, तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुपर महिलांना काही प्रेमळ शुभेच्छा पाठवू शकता आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देखील देऊ शकता. तसेच महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांचा हा दिवस साजरा करणं गरजेचं आहे.

ती आहे म्हणून हे विश्व आहे
ती आहे म्हणून घराला घरपण आहे
ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे
तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

इंग्रजीत म्हणतात लेडी, मराठीत म्हणतात महिला
जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला
अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान
कायम करा अशा स्त्रीचा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलाम
बहिणीच्या प्रेमळ मायेला सलाम
स्त्रीमध्ये दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Happy womens day 2022 womens day 2022 wishes images quotes for beautiful ladies scsm

ताज्या बातम्या