Harsingar leaves benefits : आयुर्वेदात अशा अनेक वनस्पती आहेत, ज्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपेक्षा अधिक प्रभावी आहेत. या वनस्पतींपैकी एक म्हणजे पारिजात, जिला इंग्रजीमध्ये जस्मिन (Jasmine) म्हणून ओळखले जाते. ही वनस्पती हरसिंगार, हरशृंगार व शृंगार यांसारख्या इतर अनेक नावांनीही ओळखली जाते. भारतात ‘हरसिंगार’च्या फुलांना खूप महत्त्व आहे. त्यांचा उपयोग पूजेची फुले म्हणून केला जातो. या वनस्पतीची पाने औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. अनेक आजारांतून मुळापासून सुटका होण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.

याच्या पानांचा काढा वेदना कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या वनस्पतीची पाने वाताशी संबंधित आजार बरे करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. पारिजात ही वनस्पती सर्व प्रकारच्या वेदना आणि तापावर रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात या औषधाला अज्ञात रोगांवरचा इलाज म्हटले जाते.

आयुर्वेदानुसार, या वनस्पतीच्या पानांचा काढा अशा वेदना कमी करण्यास मदत करतो, ज्या इतर कोणत्याही निदान प्रणालीद्वारे ओळखता येत नाहीत. या वनस्पतीची पाने एक अत्यंत सुरक्षित औषध आहेत, ज्यांचा मधुमेह आणि रक्तदाबावरही उपचार करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया की, पारिजाताची पाने कोणत्या आजारांवर उपचाराठी उपयोगी पडू शकतात.

या पानांमुळे गुडघे, कोपर आणि छातीच्या दुखण्यापासून आराम मिळतो

या पानांचे सेवन केल्याने गुडघे, छाती आणि कोपरांमध्ये मिळणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. पारिजाताची पाने संधिवाताच्या आजारांवर एक उत्तम उपाय आहे. या वनस्पतीला सकाळी ४ ते ६ च्या दरम्यान फुले येतात. या फुलांचा उपयोग वेदना शमवण्यासाठीचा काढा तयार करण्यासाठी केला जातो.

सायटिकावर उपचार

सायटिकाच्या नसांमधील वेदनेला सायटिका म्हणतात. ही नस पाठीच्या खालच्या भागापासून, नितंबांमधून आणि पायांमधून खाली गुडघ्याच्या अगदी खाली संपते. या समस्येमुळे चालणे आणि हालचाल करणे कठीण होऊ शकते. या नसेच्या वेदनेवर पारिजाताच्या पानांचा काढा उपयुक्त ठरतो. दोन ग्लास पाण्यात तीन पारिजाताची पाने उकळून सकाळी आणि संध्याकाळी त्याचे सेवन करावे. हा काढा शरीराच्या कोणत्याही भागातील वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करू शकतो.

संधिवातावर उत्तम उपचार

आचार्य बाळकृष्ण यांच्या मते, जर तुम्हाला संधिवाताचा त्रास होत असेल, तर पारिजात वनस्पतीची पाने, साल आणि फुले पाण्यात मिसळून काढा तयार करा आणि त्याचे सेवन करा. हा काढा तयार करण्यासाठी पाच ग्रॅम फुले, पाने आणि फांद्या घ्या, त्या २०० ग्रॅम पाण्यात उकळा आणि तो काढा प्या. ही पाने आणि फुले संधिवाताच्या वेदना कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत.

ही पाने खोकल्यावर एक उत्तम उपाय आहेत

जर तुम्हाला कफ आणि खोकल्याचा त्रास होत असेल, तर पारिजातच्या पानांचा काढा प्या. या झाडाची दोन पाने कफ आणि खोकला कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. या फुलामध्ये तुळशीची पाने मिसळून ते प्या. हा काढा शौचास साफ होण्यास आणि पोट स्वच्छ करण्यासही मदत करतो.