Hartalika Wishes 2026 Hartalika Puja Wishes in Marathi : हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याण व दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी श्रद्धापूर्वक करतात. देवी पार्वतीने महादेवाला पतीरूपाने प्राप्त करण्यासाठी हे कठीण तप अन् व्रत केले होते, अशी पौराणिक मान्यता आहे. यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी हा सण साजरा केला जाईल. या पावन प्रसंगी तुमच्या परिवाराला, मैत्रिणींना आणि आप्तजनांना हरतालिका पूजनाच्या शुभेच्छा:

शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभो अशा खास शुभेच्छा संदेशांचा संग्रह

पार्वतीसारखी भक्ती अन् महादेवाचा आशीर्वाद;
मिळो महादेवासारखा प्रेमळ अन् पाठीशी उभा राहणारा जोडीदार!
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

Hartalika Wishes 2026 : Happy Hartalika Tritiya wishes and greetings in Marathi
हरतालिका पूजन करून तुमच्या जीवनात येवो सुख अन् समृद्धी; शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने अखंड राहो सौभाग्याची वृद्धी! (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिव-पार्वतीच्या पावन आशीर्वादाने तुमच्या वैवाहिक आयुष्यात प्रेमाचे आणि आनंदाचे रंग सदैव उधळत राहोत.
हरतालिकेच्या मंगल शुभेच्छा!

उत्सव महिलांच्या श्रद्धेचा, मराठी परंपरेचा,
सौभाग्याचा अन् हरतालिकेचा
हरतालिका तृतीयेच्या सर्व भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!

मनात जपले शिवशंभूचे नाव, पूर्ण होवो तुमच्या इच्छांचा भाव;
हरतालिका व्रताची ही पावन प्रीत, आयुष्यात नांदो संसाराची सुंदर रीत!

hartalika wishes
हरतालिका पूजन करून तुमच्या जीवनात येवो सुख अन् समृद्धी; शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने अखंड राहो सौभाग्याची वृद्धी! (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नाते अतूट जगती सात पावलांचे,
अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे!
हरतालिका सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

तपाचे ते तेज अन् निष्ठेचा हा ध्यास;
महादेवाच्या कृपेने पूर्ण होवो मनीची आस,
मिळो मनासारखा अन् जपणारा जोडीदार!
हरतालिका पूजनाच्या शुभेच्छा!

hartalika vrat
हरतालिका पूजन करून तुमच्या जीवनात येवो सुख अन् समृद्धी; शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने अखंड राहो सौभाग्याची वृद्धी! (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हरतालिका पूजन करून तुमच्या जीवनात येवो सुख अन् समृद्धी,
शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने अखंड राहो सौभाग्याची वृद्धी!

जसा माता पार्वतीला मिळाला नीलकंठाचा पाठिंबा,
तसाच तुमच्याही आयुष्यात यावा मनासारखा आणि गुणी जोडीदार…
हरतालिका पूजनाच्या शुभेच्छा!

Hartalika Wishes 2026 : Happy Hartalika Tritiya wishes and greetings in Marathi
हरतालिका पूजन करून तुमच्या जीवनात येवो सुख अन् समृद्धी; शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने अखंड राहो सौभाग्याची वृद्धी! (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

माता पार्वतीने केले हरतालिका व्रत, म्हणून तिला मिळाले पतीस्वरूप शंकर.
तुम्हालाही मिळो मनासारखा आणि शंकरासमान भोळा-सुंदर पती!
हरतालिकेच्या शुभेच्छा!

हरतालिका पूजन करून तुमच्या जीवनात येवो सुख अन् समृद्धी,
शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने अखंड राहो सौभाग्याची वृद्धी!

देवि देवि उमे गौरि त्राहि मां करूणानिधे ।
ममापराधः क्षन्तव्यः भुक्ति-मुक्ति प्रदा भव ॥
हरतालिका तृतीयेच्या मंगल शुभेच्छा!

कुमारिकांना मिळो मनासारखा सोबती,
सुवासिनींना मिळो अखंड सौभाग्यप्राप्ती;
शिव-पार्वती करो सर्वांची इच्छापूर्ती!
हरतालिका व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!

हरतालिकेचा सण सौभाग्याचा, पती-पत्नीच्या पवित्र नात्याचा…
सौभाग्य अखंड मिळो प्रत्येक सुवासिनीला,
हेच मागणे शंकर-पार्वतीला!
हरतालिका व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या संसाराला शिव-शक्तीचा आशीर्वाद सदैव मिळो,
आयुष्यात तुमच्या सुख-समृद्धी येवो!
हरतालिकेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आशीर्वाद मागू या शिवाकडे अखंड सौभाग्याचा…
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

कुमारिका करिती व्रत मनपसंत जोडीदारासाठी,
सुवासिनी करती पूजा अखंड सौभाग्यासाठी…
शंकर-पार्वती देती आशीर्वाद, करती कृपा जन्मोजन्मासाठी!
हरतालिका पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विवाहेच्छुक मुलींनी का करावे हरतालिकेचे व्रत आणि कशी करावी पूजा?

हरतालिका व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी, तर विवाहेच्छुक मुली मनासारखा व सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात. पूर्वी निर्जल ठेवले जाणारे हे व्रत आता फलाहार करूनही केले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान व घर स्वच्छ केल्यावर, शिव-पार्वतीच्या मूर्तीची व शिवलिंगाची पूजा करून व्रताच्या कथेचे पठण केले जाते. जर विवाह जुळण्यात अडथळे येत असतील, तर या दिवशी देवी पार्वतीच्या स्तोत्राचे पठण करणे अत्यंत प्रभावी मानले जाते; यामुळे विवाहेच्छुकांचे विवाह जमण्यास मदत होते आणि विवाहितांचे वैवाहिक जीवनही सुखमय राहते.